शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गृहविलगीकरणातील रुग्णांनी वाढविली महापालिकेची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:28 IST

ठाणे : राज्य शासनाने १८ जिल्ह्यांत गृहविलगीकरण बंद केल्याने ठाणे महापालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील अशा रुग्णांना अलगीकरण केंद्रात ...

ठाणे : राज्य शासनाने १८ जिल्ह्यांत गृहविलगीकरण बंद केल्याने ठाणे महापालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील अशा रुग्णांना अलगीकरण केंद्रात दाखल होण्याची विनंती केली आहे. परंतु, घरी योग्य प्रकारच्या सोयीसुविधा आहेत, काम थांबेल, इंटरनेटची सुविधा मिळणार नाही. घरचे जेवण मिळणार नाही, अशी विविध कारणे देऊन ते अलगीकरण केंद्रात जाण्यास टाळाटाळ करीत असल्याने महापालिकेची चिंता वाढली आहे.

ठाणे महापालिका हद्दीत एक लाख २८ हजार कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. त्यातील एक लाख पाच हजार ५२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर एक हजार ९१९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या एक हजार ५३७ रुग्णांवर प्रत्यक्ष स्वरुपात उपचार सुरू आहेत. त्यातील ५८२ रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. तर ७०७ रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. २४८ रुग्ण गंभीर असून, १६७ आयसीयू आणि ८१ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. आजही ५४९ रुग्ण हे घरीच उपचार घेत आहेत. यातील ५० टक्के रुग्ण हे राज्य शासनाचा आदेश होण्यापूर्वीचे असून, उर्वरित नंतरचे आहेत.

काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने राज्यातील १८ जिल्ह्यांत गृहविलगीकरण बंद केल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेनेदेखील ते बंद केले आहे. परंतु, असे असले तरी घरी उपचार घेत असलेल्या रुग्णांनी महापालिकेच्या अलगीकरण केंद्रात उपचारासाठी दाखल व्हावे, अशी विनंती महापालिका त्यांना करीत आहे. परंतु, ते जाण्यास तयार नाहीत, आम्ही घरीच बरे होऊ असे सांगत आहेत. घरात असलो तरी आमची खोली वेगळी आहे, वॉशरूम वेगळा आहे, तसेच घरी जे हवे ते वेळेत खाण्यासही मिळत आहे, अशी कारणे ते देत आहेत. यापुढेही जाऊन कोरोना झाला असला तरी लक्षणे नसल्याने घरी बसून काम करता येत आहे, कामाचे खाडे होत नाहीत, कामामुळे इतर कोणत्याही गोष्टींचा विचार मनात येत नाही. काम करण्यासाठी इंटरनेट आणि लॅपटॉपची सुविधादेखील आहे. परंतु, अलगीकरण केंद्रात दाखल झाल्यानंतर खाण्यापिण्याचे हाल ते होतीलच, शिवाय तेथे दिवस काढणेदेखील कठीण होणार आहे. तसेच कपड्यांची बॅग घेऊन पुन्हा घरच्यांपासून वेगळे होऊन त्यांच्याही मनात भीती निर्माण होणार आहे, अशीही कारणे देऊन ते अलगीकरण केंद्रात उपचार घेण्यासाठी दाखल होत नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.