शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील १६ अनाधिकृत हॉटेल्सवर पालिकेचा बुल्डोजर, कोठारीतील बार, हुक्का पार्लर सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 17:50 IST

महासभेत झालेल्या गदारोळानंतर सोमवार पासून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली कोठारी कंपाऊंडमधील बार, हुक्का पार्लर सील करण्यात आले. तर शहरातील वाढीव बांधकाम केलेल्या हॉटेलवर कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देकोठारी कंपाऊंडमधील ६ हॉटेल आस्थापना सील१० अनाधिकृत हॉटेलवर पालिकेचा बुल्डोजर

ठाणे - मुंबईतील कमला मिल दुर्घटनेनंतर ठाण्यातील कोठारी कंपाऊंडमधील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याच्या मागणीवरून शनिवारी झालेल्या महासभेत भाजपा, राष्टÑवादी काँग्रेसने प्रशासनाला धारेवर धरल्यावर ज्या हॉटेल, पबनी दिलेल्या मुदतीत कागदपत्रांची पूर्तता केली नसेल त्यांच्यावर सोमवारपासून कारवाई बडगा उगारण्यात आला आहे. त्यानुसार समोवारी शहराच्या विविध भागात एकाच वेळेस कारवाई करुन ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कोठारी कंपाऊंडमधील अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र नसलेले हुक्का पार्लर्स, लाऊंज बार आणि हॉटेल्स अशा एकूण ६ आस्थापना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत सील करण्यात आल्या. तर शहरातील जवळपास १० अनाधिकृत हॉटेल्सवर बुलडोझर चालविण्याची कारवाई करण्यात आली.                 शनिवारी झालेल्या महासभेत प्रश्नोत्तराच्या तासाला भाजपाच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी कोठारी कंपाऊंडचा मुद्दा उपस्थित केला. तेथील हॉटेल, बार आणि पबवरील कारवाईचे काय झाले, असा सवाल त्यांनी केला. केवळ कारवाईचा दिखावा करुन अभिनंदनचा थाप मिळविण्याचे काम प्रशासनाने केले असल्याचेही त्यांनी यावेळी नमुद केले होते. परंतु कारवाईचा फार्सच यावेळी झाल्याचा आरोपही त्यांनी केला होता. येथील सर्व आस्थापनांना सप्टेंबर महिन्यात ९० दिवसांच्या आत कागदपत्रे सादर करण्याची नोटीस बजावली होती. ती मुदत २८ डिसेंबरला संपली, त्यांनंतर कारवाई करण्यास घेतली असता हॉटेल मालकांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार त्यांना २० जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली असल्याची माहिती अतिक्रमण उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी दिली यावेळी दिली होती.दरम्यान दुसरीकडे कमला मील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील ४५८ हॉटेल आस्थापना देखील मागील काही दिवसापासून रडावर आल्या होत्या. आयुक्तांनी दिलेल्या १५ दिवसांच्या मुदतीत शहरातील ५४२ हॉटेल्स आणि बार मालकांनी ना हरकत प्रमाणपत्रासाठी तयार केलेले अर्ज अग्निशमन विभागाकडून घेतले होते. त्यातील अटी शर्थींची पुर्तता करत असल्याचा दावा करत १८० जणांनी अर्ज या विभागाला सादरही केले. मात्र, अग्निशमन अधिकाºयांच्या तपासणीत यातील एकही हॉटेलवाले पास झालेले नाहीत. अग्निसुरक्षेच्या अटी शर्थी जाचक असल्याचे या व्यावसायीकांचे म्हणणे आहे. त्यावर प्रशासनाने तोडगा काढावा अशी विनंती या व्यावसायीकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे केली आहे. त्यावर चर्चासुध्दा सुरू आहे. मात्र, आयुक्तांनी या आस्थापनांवर देखील सोमवार पासून कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार कोठारी कंपाऊंड मधील हॉटेल, पब लाऊन्स, बार आणि शहरातील ४५८ हॉटेल आस्थापनांवर सोमवार पासून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. महापालिकेच्यावतीने पोलिस बंदोबस्तात सकाळी १० वाजता या कारवाईस सुरूवात करण्यात आली. यामध्ये अग्नीशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र नसल्याने कोठारी कंपाऊंडमधील एमएच ४ पब आणि बार, डान्सिग बॉटल पब, लाऊंज १८ बार, व्हेअर वई मेट, बार इन्डेक्स हे हुक्का पार्लर्स सील करतानाच या ठिकाणी करण्यात आलेले वाढीव बांधकाम तोडून टाकण्यात आले.दुसरीकडे नौपाडा प्रभाग समिती अतंर्गत देखील करण्यात आलेल्या कारवाईमध्ये पुरेपूर कोल्हापूर, साईकृपा या हॉटेल्सच्या ठिकाणी करण्यात आलेले वाढीव बांधकाम तोडून टाकण्यात आले तर एक्सपिरिअन्स हा टेरेस बार पूर्णत: तोडून टाकण्यात आला. त्याचबरोबर मल्हार सिनेमा येथील दुर्गा बार आणि रेस्टॉरंट तसेच जांभळी नाका येथील अरूण पॅलेस बार अग्नीशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र नसल्याने सील करण्यात आले.दरम्यान रामचंद्रनगर येथील जयेश हा लेडीज बार पुर्णत: जमीनदोस्त करण्यात आला तर उथळसर येथील फुक्रे बारसह इतर ३ रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात आली. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त