शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा गॅरेजवर पालिकेची कारवाई; २० हजारांचा दंड वसूल, व्यावसायिकांमध्ये घबराट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 23:22 IST

याबाबत नागरिकांच्या तक्रारी सतत येत आहेत. गुरुवारी शिंपी यांच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने या गॅरेज व कार व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली.

उल्हासनगर : शहरातील कल्याण-बदलापूर रस्त्यावरील बेकायदा गॅरेज व कार मार्केटवर गुरुवारी महापालिकेचे सहायक आयुक्त गणेश शिंपी व पोलिसांनी एकत्रित कारवाई करून २० हजाराचा दंड वसूल केला. 

उल्हासनगरमधून जाणाऱ्या कल्याण-बदलापूर रस्त्याचे १०० फुटी रुंदीकरण केल्यानंतर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. रस्त्याजवळ गॅरेज व कार विक्रेते बेकायदा गाड्या लावत असल्याने त्यांच्यावर महापालिकेने अनेकदा कारवाई केली. मात्र कारवाईनंतर दुसऱ्या दिवशी परिस्थिती जैसे थे राहते. 

याबाबत नागरिकांच्या तक्रारी सतत येत आहेत. गुरुवारी शिंपी यांच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने या गॅरेज व कार व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच काही साहित्य जप्त केले. रस्त्याच्या बाजूला गाड्या लावून कोंडी करणारे गॅरेज व कार विक्रेत्यांना समज देऊनही पालिका नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे उघड झाले.

शहरातून जाणाऱ्या कल्याण-बदलापूर रस्त्याजवळ बेकायदा गाड्या उभ्या करणाऱ्यांवर कारवाई तसेच  दंड वसूल करून गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. कोणीही रस्त्याजवळ गाड्या उभ्या करू नयेत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी हिराघाट विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरही गॅरेजवाल्यांची संख्या मोठी असून रस्त्याच्या कडेला असंख्य ट्रक, गाड्या उभ्या केल्या जातात. यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता व्यक्त केली जात असून त्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.