शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्य्राच्या कलंकित प्रतिमेने अस्वस्थता : सूडापोटी स्फोटके लपवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 05:50 IST

यापूर्वी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंधित व्यक्तींना अटक झाल्यामुळे अगोदरच मुंब्रा शहर बदनाम झाले असताना आता स्थानिक रहिवाशांच्या वैयक्तिक वादापोटी स्फोटके ठेवून पुन्हा एकदा शहराला बदनाम केल्याबद्दल स्थानिक नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

- कुमार बडदे मुंब्रा : यापूर्वी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंधित व्यक्तींना अटक झाल्यामुळे अगोदरच मुंब्रा शहर बदनाम झाले असताना आता स्थानिक रहिवाशांच्या वैयक्तिक वादापोटी स्फोटके ठेवून पुन्हा एकदा शहराला बदनाम केल्याबद्दल स्थानिक नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.येथील एका व्यावसायिका बरोबर असलेल्या वादामुळे त्याच्या जागेत भंगार अवस्थेत उभ्या असलेल्या चारचाकी वाहनात मोठ्या प्रमाणावर स्फोटके ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी उघडकीस आणले. यापूर्वी मुदब्बीर या तरुणाला एनआयएच्या पथकाने अटक केली. तो इसिस संघटनेकरिता तरुणांची भरती करीत असल्याचा संशय होता. त्यानंतर आणखी एकाला अटक केली. ओमर उर्फ नाझिम याला मुंबई दहशतवादी पथकाने अटक केली होती.मुंब्रा शहर सातत्याने दहशतवादी कारवाया, स्फोटके, अनधिकृत बांधकामे, गुन्हेगारी याकरिता प्रकाश झोतात येत आहे. शहराची सतत बदनामी होत असल्याने येथे राहणारा एखादा तरुण कुठे रोजगाराकरिता गेला व त्याने मुंब्रा येथील पत्ता सांगितला की, त्याला नोकरी नाकारली जाते. मुंब्रा येथील मुलींशी लग्न करण्यास नकार दिला जातो. कुठेही मुंब्रा येथील रहिवासी असल्याचे सांगितल्यावर लोक समोरील व्यक्ती जणू दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्यासारखी संशयाने पाहिले जाते. शहरातील सामाजिक संघटना, काही राजकीय नेते, पत्रकार, स्थानिक नागरिक शहराची व पर्यायाने येथील रहिवाशांची ही ओळख पुसण्याकरिता धडपडत असताना सूड भावनेतून अद्दल घडवण्याकरिता स्फोटके ठेवण्याची क्लृप्ती वापरात आणण्यामागे शहरातील काही मूठभर लोकांच्या मनात मुंब्रा आणि दहशतवाद ही ओळख किती घट्ट रुजली आहे, याचाच प्रत्यय येतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे.वैयक्तिक वादातून शहराला बदनाम करणाºयांविरोधात सक्त कारवाई करण्यात यावी.-शिमम खान, विभागीय अध्यक्ष, राष्ट्रवादी पार्टीवैयक्तिक वादामुळे स्फोटके ठेवल्याने शहर बदनाम झाले. ही अंत्यत खेदाची बाब आहे. असा प्रकार व्हायला नको होता.-इसाहक बिराजदार,दूरदर्शनवरील संहिता लेखक व स्थानिक नागरीकशहराचे नाव उज्ज्वल व्हावे यासाठी प्रयत्न करण्या ऐवजी सूडबुद्धीने शहराची बदनामी करणाºयांवर कडक कारवाई करण्यात यावी.-नजिमुद्दीन मलिक, स्थानिक नागरीक