शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

By अनिकेत घमंडी | Updated: June 12, 2025 08:12 IST

Mumbai Suburban Railway: मुंबई उपनगरात ३२ नवी स्थानके प्रस्तावित आहेत. यांची उभारणी केली, तर सध्याच्या स्थानकांवर होणाऱ्या गर्दीचे विभाजन होईल व लोकलमध्ये प्रवेश करण्यासाठी जीवघेणी गर्दी होणार नाही. रेल्वे मंत्रालयाने प्रस्तावित स्थानकांची कामे मार्गी लावणे गरजेचे आहे, अशी मागणी प्रवासी संघटना करत आहेत.

-अनिकेत घमंडीडोंबिवली - ठाणे जिल्ह्यात नवीन ठाणे, चिखलोली, मानस मंदिर, दातीवली, पारसिक यांसह मुंबई उपनगरात ३२ नवी स्थानके प्रस्तावित आहेत. यांची उभारणी केली, तर सध्याच्या स्थानकांवर होणाऱ्या गर्दीचे विभाजन होईल व लोकलमध्ये प्रवेश करण्यासाठी जीवघेणी गर्दी होणार नाही. रेल्वे मंत्रालयाने प्रस्तावित स्थानकांची कामे मार्गी लावणे गरजेचे आहे, अशी मागणी प्रवासी संघटना करत आहेत.

चिखलोली स्थानक सात वर्षांपूर्वी मंजूर झाले. त्याला निधी मिळून बांधकामही सुरू आहे. नवीन ठाणे स्थानकाचे तेच रडगाणे आहे. दिवा-कोपर मार्गावर दातीवली, बदलापूरजवळ समर्थवाडी स्थानकाचा प्रस्ताव तसाच आहे. आसनगावजवळ मानस मंदिराचा विषयही तसाच. जिल्ह्यात झपाट्याने नागरीकरण वाढल्याने कल्याणच्या पुढे वांगणी, शेलू, नेरळपर्यंत आणि टिटवाळा, खडवली, आसनगाव, वासिंद परिसरात नागरिक घरांना पसंती देत आहेत. त्यामुळे तेथे नव्याने रेल्वेस्थानक होणे गरजेचे आहे. मात्र, त्याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. गुरवलीच्या मागणीचे ५० वर्षे भिजत घोंगडे आहे.

फेऱ्या वाढवागर्दीच्या विभाजनासाठी लोकल फेऱ्या वाढवणे त्यासोबतच नव्याने रेल्वे स्थानकांची निर्मिती गरजेची आहे. चिखलोली स्थानक झाल्यास अंबरनाथ स्थानकाचा भार कमी होईल, मानस मंदिर झाल्यास आसनगाव, वासिंद आणि दातीवली झाल्यास दिव्याचा भार कमी होईल.

नवे ठाणे स्थानक झाल्यावर सध्याच्या ठाणे स्थानकातील होणारी गर्दी कमी होईल. तेथे लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवल्यास ठाणे स्थानकाला मोकळा श्वास घेता येईल. प्रस्तावित पारसिक स्टेशन झाल्यास मुंब्रा, कळवा स्थानकातील गर्दीचे विभाजन होईल; परंतु नव्या स्थानकासाठी रेल्वे प्रशासनाच्या इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे मत प्रवासी व्यक्त करत आहेत. 

दातीवली स्थानकाची मागणी १९८० पासून, तर  गुरवलीची मागणी १९६५ पासून प्रलंबित आहे. बदलापूर-वांगणी मार्गावर समर्थवाडी स्थानक प्रस्तावित आहे. प्रवाशांची मागणी असल्याने रेल्वेने सर्व्हे करावे व त्यांना मंजुरी द्यावी.- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष,ठाणे रेल्वे प्रवासी संस्था.

अंबरनाथजवळ असलेल्या चिखलोली स्थानकाचे काम संथगतीने सुरू आहे. हे स्थानक झाल्यास बदलापूर, अंबरनाथ स्थानकांतील गर्दीवर निश्चित परिणाम होईल. प्रवाशांच्या गर्दीचे विभाजन झाले, तरच सध्याच्या स्थानकात आणखी सुविधा देण्याकडेही लक्ष देता येईल. नव्याने स्थानके होणे गरजेचे आहे. - अनुप मेहेत्रे,  दक्ष प्रवासी, अंबरनाथ 

टॅग्स :Mumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वेMumbai Localमुंबई लोकल