शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन धडाडणार ठाणे, नवी मुंबई, शीळमार्गे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 06:46 IST

अहमदाबाद दरम्यान ताशी ३२० किमीच्या वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेनवरून राजकीय टीकेची झोड उठते आहे. अर्थात अजूनही विरोधाची धार कमी झालेली नाही. ‘आहेत त्या गाड्या नीट चालवा कशाला हवी बुलेट ट्रेन’, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र केंद्र सरकारचे बुलेट ट्रेन हे स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

- पंकज रोडेकर,ठाणे मुंबई-अहमदाबाद दरम्यान ताशी ३२० किमीच्या वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेनवरून राजकीय टीकेची झोड उठते आहे. अर्थात अजूनही विरोधाची धार कमी झालेली नाही. ‘आहेत त्या गाड्या नीट चालवा कशाला हवी बुलेट ट्रेन’, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र केंद्र सरकारचे बुलेट ट्रेन हे स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.मुंबईतून निघणारी ही बुलेट ट्रेन ठाण्याच्या वेशीवर येईल तेव्हा ती भुयारीमार्गे जाणार आहे. या बुलेट ट्रेनच्या मार्गासाठी लागणाºया जागेवरून शेतकºयांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. गुगलवरून तयार केलेल्या रेखाचित्रात ठाणे तालुक्यातील ९ गावांमधील १०४ प्लॉटवरील १९ हेक्टर जागा लागणार आहे. ठाण्यातून किती मीटरची जागा लागणार आहे, ती किती उंचावरून धावणार आहे. याची माहिती शेतकºयांना न देताच राष्टÑीय हाय स्पीड रेल निगम कंपनीच्या अधिकारी, कर्मचाºयांनी अचानक ठाणे तालुक्यात जाऊन सर्वेक्षणाला सुरूवात केली. त्यामुळे विरोधाची ठिणगी पडली.आगासन गाव बचाव संघर्ष समिती आणि आगरी युवक संघटना शेतकºयांच्या मदतीसाठी धावून आल्या. त्यानंतर शेतकºयांचा लढा खºया अर्थाने सुरू झाला. संघटनांमार्फत शेतकरी एकत्र येत असल्याचे पाहून त्यांचा रोष ओढवून घेण्यापूर्वी ठाणे जिल्हा प्रशासनाने सावधगिरीने पावले टाकण्यास सरूवात केली आहे. कुठेही कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याचाही काळजी घेतली जात आहे.ठाण्याच्या खाडीत ४० मीटर खोल जमिनीत बोगद्यातून बुलेट ट्रेन जाणार आहे. ठाणे तालुक्यात येताना ती ठाणे खाडी, कोपरखैरणे, सावली, घणसोली, महापे, अडवली, भुतवली अशी शीळपर्यंत भुयारी मार्गाने धडधड करत येणार आहे. शीळ येथून ती डावले, पडले, देसाई, आगासन, बेतवडे, म्हातार्डी अशी एलिव्हेटेड (म्हणजे उड्डाण) मार्गाने जाणार आहे. या गाडीला म्हातार्डी येथेही एक थांबा नियोजनात आहे, असे सांगितले जाते. पण ते नकाशात दाखवलेले नाही. त्यानंतर ही बुलेट ट्रेन भिवंडी तालुक्यातील उसरघर, भारोडी, अंजूर, सारंग, सुरई, मानखोली, दापोडे, दिवे, अंजूर, केशळी, पुरने, काल्हेर, कोपर, केवानी, खारबाव, मालोडी, पायगाव, पोये, दिवे, वसई खाडी अशी पुढे पालघर जिल्ह्यात जाणार आहे. तेथे विरार आणि बोईसर ही स्थानके आहेत.मुंबईहून ठाणे किंवा भिवंडीला भुयारी मार्गाने थेट जाणे शक्य असूनही ही बुलेट ट्रेन भलामोठा वळसा घेत ठाणे खाडी, नवी मुंबईचा काही भाग, शीळ या मार्गाने का जाणार आहे, हा वळणमार्ग कुणाच्या हितासाठी तयार होतो आहे, असा प्रश्नही शेतकºयांना पडला आहे.अशा आहेत शेतकºयांच्या मागण्याच्ठाणे महापालिकेने दिवा हे आजवर विकासाच्या दृष्टीने दुर्लक्षित ठेवल्याने येथे रेडीरेकनरचे दर कमी आहे. जर हा जागतिक दर्जाचा प्रकल्प असेल, तर त्या प्रकल्पाप्रमाणे किंवा बीकेसीच्या रेडीरेकनरच्या दराप्रमाणे शेतकºयांना मोबदला मिळाला पाहिजे. तो दर पाच पटीने आणि २५ टक्के हवा.च्या प्रकल्पात बाधित होणाºया शेतकºयांच्या कुटुंबातील एकाला नोकरी मिळावी.च् बुलेट ट्रेनमुळे जे शेतकरी बाधित होणार आहेत, त्या शेतकºयांना तातडीने एनओसी मिळण्याबाबत ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव व्हावा. तसेच ती एनओसी लगेच मिळावी.च्बाधितांना फ्री-पास मिळावे.

शेतक-यांच्या ज्या काही मागण्या आहेत. त्याचे तोंडी आश्वासन नको तर लेखी स्वरुपात द्यावे.प्रकल्पबाधितांमध्ये २५० शेतकºयांचा समावेशठाणे तालुक्यातून धावणाºया बुलेट ट्रेनसाठी लागणा-या जागेसाठी जे शेतकरी बाधित होणार आहेत त्यांची संख्या २०० ते २५० च्या आसपास असण्याची शक्यता आहे. हे सर्व शेतकरी ९ गावातील असल्याने या बाधितांपर्यंत पोहचणे प्रशासनाला शक्य होणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावात जाऊन प्रशासन या बाधित होणा-या शेतक-यांशी संवाद साधणार आहे. तसेच प्रत्येक शेतक-याचे समाधान होईपर्यंत चर्चा केली जाणार असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने शेतक-यांबरोबर झालेल्या पहिल्या बैठकीत केला आहे.कुणाच्या हितासाठी मार्गाला वळसा?ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्याचा वरवंटा, मेट्रोचे मार्ग, मालवाहतुकीचा जलद मार्ग (डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर), बडोदा महामार्ग, समृद्धी महामार्ग हे सारे कमी होते की काय म्हणून आता बुलेट ट्रेन ठाणे जिल्ह्यातून धडाडत जाणार आहे. या प्रकल्पाच्या कचाट्यात शीळ-दिवा पट्ट्यातील काही गावे सापडली आहेत. तेथे विकास होईल, असे सांगितले जात असले तरी वायूवेगाने जाणाºया या गाडीचा फायदा शेतकरी, ग्रामस्थ की विकासकांना होणार, यावर कुणी तोंड उघडायला तयार नाही. शेतकरी जातो जीवानिशी हे आजवरचे ब्रीद पुन्हा आळवले जात असल्याने शेतक-यांनी प्रकल्पाला विरोध करण्यापेक्षा त्याच्या भरपाईचे पॅकेज, भरपाई, पुनर्वसन याकडे लक्ष वेधले आहे. बीकेसीतून ठाण्यात येणारी ही बुलेट ट्रेन ठाणे खाडीमार्गे कोपरखैरणे, महापे, शीळ असा वळसा घेत आागासन, म्हातार्डेमार्गे भिवंडीहून पालघर जिल्ह्यात जाणार आहे. ठाण्यातून थेट म्हातार्डे किंवा भिवंडी गाठणे शक्य असतानाही बुलेट ट्रेन कुणाच्या हितासाठी हा वळसा घेत येणार आाहे, असा प्रश्न प्रकल्पग्रस्तांना पडला आहे. त्यातही या गाडीला ठाणे आणि म्हातार्डे अशी दोन रेल्वेस्थानके असतील असे काही जण सांगत आहेत, तर म्हातार्डे येथील स्टेशन हेच ठाणे जिल्ह्यातील स्टेशन असेल असे सांगितले जात असल्याने या गाडीचा काय फायदा हाही प्रश्न उपस्थित झाला आहे.समृद्धीचे नियम लागू राहणारबुलेट ट्रेनसाठी भरपाई देताना समृद्धी महामार्गाचे नियम लागू राहणार आहे. त्यामुळे नवीन कायद्याप्रमाणे रेडीरेकनरचे दर असणार आहे. हा मोबदला निश्चित केलेल्या दराचा दुप्पट आणि त्यावर २५ टक्के अतिरिक्त रक्कम दिली जाणार आहे. रेडी रेकनरचे दर हे २६ मे २०१५ रोजी काढलेल्या अध्यादेशानुसारच आहेत, अशा माहिती अधिकाºयांनी दिली.मोजणी गरजेची असल्याचे प्रशासनाचे मतगुगलनुसार मार्ग कसा जातो हे निश्चित झाले. पण, तो कुणाच्या कि ती जागेतून जाणार आहे हे प्रत्यक्ष मोजणी झाल्याशिवाय समजणार नाही. त्यामुळे मोजणी करून हद्द निश्चित करावी लागेल, त्यामुळे मोजणी करू द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. बाधित शेतकºयांना एफएसआय स्वरूपात मोबदला हवा आहे. तो तसा मिळणार नसून तो रोख रकमेच्या स्वरुपात मिळणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरही म्हातार्डे स्थानक होणार?मध्य रेल्वेच्या दिवा आणि कोपर या दोन्ही स्थानकांच्या मधोमध म्हातार्डे गाव आहे. तेथे उजव्या बाजूला दिसणारे म्हातार्डेश्वराचे मंदिर ही त्या गावाची ओळख सांगते. बुलेट ट्रेनचे ठाण्यातील दुसरे स्थानकही त्या भागात होणार आहे. बुलेट ट्रेनच्या स्थानकात पोचण्यासाठी गाठण्यासाठी मध्य रेल्वेवर त्या भागात स्थानक होणे गरजेचे आहे. जसे मेट्रोसाठी घाटकोपर, अंधेरी स्थानके जोडलेली आहे. चेंबूर ्सथानक मोनोला जोडलेले आहे. कोपर स्थानक पनवेल-डहाणू मार्गाला जोडलेले आहे. तसेच हे स्थान व्हावे, ही अपेक्षा आहे. अन्यथा बुलेट ट्रेनच्या स्थानकापर्यंत प्रवाशांना पोहोचणे शक्य होणार नाही. हे स्थानक झाल्यास ठाण्यातून किंवा कल्याण-डोंबिवली, कर्जत ते कसारा पट्ट्यातील प्रवाशांनाही तेथे जाणे शक्य होणार आहे.२० हेक्टर जमिनीची आवश्यकताठाणे तालुक्यातील सावली, घणसोली, शीळ, डावले, पडले, देसाई, आगासन, बेटावडे, म्हातार्डे या ९ गावातील सुमारे २०० ते २५० शेतकºयांची मिळून सुमारे २० हेक्टर जमीन सरकारला घ्यावी लागणार आहे. यामध्ये केवळ शीळ भागातील काही जमीन वन क्षेत्रातील आहे. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, म्हातार्डे, विरार, बोईसर अशी एकूण पाच स्थानके असतील.गावपण हिरावले जाणारबुलेट ट्रेन ठाणे तालुक्यातील ९ गावांमधून जाणार आहे. ती गावे जरी महापालिकेच्या क्षेत्रात असली तरी, तेथे अजूनही खेडेगावासारखे वातावरण आहे. या गावात बहुसंख्य ग्रामस्थ हे भूमिपूत्र आहे. त्यामुळे त्या-त्या गावात अजूनही गावपण दिसते. अजून ही गावे ते शांत आहेत. मात्र, हा प्रकल्प मार्गी लागल्यास तेथील गावपण हिरावले जाणार आहे.बुलेट ट्रेनची कारशेड भिवंडीतमुंबई ते अहमदाबाद धावणाºया बुलेट ट्रेनची महाराष्टÑात पाच स्थानके आहेत. यामध्ये मुंबई, ठाणे, म्हातार्डे, विरार आणि बोईसर यांचा समावेश असेल. त्याचप्रमाणे या चार स्थानकांच्या मध्यावर असलेल्या भिवंडी तालुक्यात बुलेट ट्रेनचे कारशेड उभारण्यात येणार आहे.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनthaneठाणे