शहरं
Join us  
Trending Stories
1
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
2
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
3
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
4
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
5
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
6
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
7
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
8
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
9
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
10
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
11
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
12
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
14
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
15
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
16
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
17
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
18
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
19
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
20
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video

बहुभाषिक विद्यार्थ्यांना चित्र, गाण्यांचा आधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 02:59 IST

परराज्यातून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या मजुरांची मुले कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शाळेत शिकत असून, त्यांच्या भाषेची अडचण लक्षात घेऊन त्यांच्या अध्यापनासाठी शिक्षकांना चित्र, गाणी आणि गोष्टींचा आधार घ्यावा लागत आहे.

- जान्हवी मौर्यडोंबिवली : परराज्यातून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या मजुरांची मुले कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शाळेत शिकत असून, त्यांच्या भाषेची अडचण लक्षात घेऊन त्यांच्या अध्यापनासाठी शिक्षकांना चित्र, गाणी आणि गोष्टींचा आधार घ्यावा लागत आहे.डोंबिवलीतील मोठागाव ठाकूर्ली येथील लोकमान्य टिळक पालिकेच्या शाळेतील मुख्याध्यापक रेखा आव्हाड यांनी सांगितले की, आमच्या शाळेत हिंदी, कन्नड भाषिक बालवाडीकरिता चार व पहिलीत दोन विद्यार्थी आहेत. त्यांना मराठी बोलता येत नाही. त्यांचे आईवडील मजूर आहेत. काही विद्यार्थ्यांचे आईवडील हे भाजीविक्रीचा धंदा करतात. त्यांना चित्र, गोष्टी आणि गाणी यांच्या माध्यमातून मराठी शिकवावे लागते. आमच्या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत ई लर्निंग सुविधा आहे. चार्ट, कार्डचाही वापर केला जातो. या मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे लागते. त्यांना कधी सुटीही द्यावी लागते. अन्यथा त्यांची शाळा सुटू शकते.काही मुले अचानक शाळेत येणे बंद झाली तर त्यांच्या पालकांच्या भेटी घेऊन त्यांचे समुपदेशन करावे लागते. त्यामुळे मराठी भाषिक मुलांच्या तुलनेत बहुभाषिक मुलांच्या शिक्षणाकडे जास्त लक्ष द्यावे लागते.डोंबिवलीजवळ असलेल्या नांदिवली पाडा येथील ठाणे जिल्हा परिषदेच्या नंदादीप शाळेचे मुख्याध्यापक अशोक पासळकर यांनी सांगितले, या शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू असल्याने तेथे काम करणाऱ्या कामाठी व मजुरी करणारे असे कामगार असून, त्यांच्या मुलांनी या शाळेत प्रवेश घेतला आहे. त्यामुळे आमच्या शाळेत आंतरभारतीचे दर्शन होते. पंजाब, उत्तरप्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड, आंध्रप्रदेश, नेपाळ या भागातील कामगार काम करीत असून ते त्याच भागात मुक्कामला असल्याने पालकांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे.आमच्या शाळेत कोणतीही फी आकारली जात नाही. शैक्षणिक साहित्य, गणवेश विद्यार्थ्यांना मोफत दिले जातात. विविध भाषिक मुले आपणहून शाळेत दाखल झाली आहेत. त्यांना आम्हाला मराठीतून शिकविण्यासाठी त्यांच्या भाषेतून सांगावे लागते. एकाच वेळी तीन चार भाषेतून शिक्षण द्यावे लागते. हे विद्यार्थी इतर भाषिक असले तरी त्यांना मराठीतून शिक्षणाची आवड आहे. म्हणूनच त्यांनी स्वत:हून शाळेत प्रवेश घेतला आहे.>कल्याणच्या गांधी चौकातील महापालिकेच्या शाळा क्रमांक १ चे मुख्याध्यापक भगवान दळवी यांनी सांगितले की, आमच्या शाळेत बहुभाषिक मुले आहेत. गुजराती मुलांनी त्यांच्या भाषेतून शिक्षण घेतले पाहिजे, मुस्लिम मुलांनी उर्दू भाषिक शाळेतून शिक्षण घेणे अपेक्षित आहे. मात्र आसपासचा परिसर मराठी असल्याने ही मुले मराठी शाळेत शिकणे पसंत करीत आहेत. त्यांना मराठी माध्यमातून शिक्षण देणे कठीण नाही. आमच्या शाळेत ई लर्निंग नाही. त्यामुळे मुलांना जुळवून घ्यावे लागते. काही फळ विक्रेत्यांची, भाजी विक्रेत्यांची मुले आहेत. त्यांना शिक्षणात सूट द्यावी लागते. शाळेत पाच ते सहा मुले बहुभाषिक आहेत. त्यांना मराठीतून शिक्षण दिले जात आहे.