शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नव्या पुलाला मुहूर्त

By admin | Updated: October 10, 2016 03:22 IST

पावसाळ्यात पडलेल्या वडवली पुलावर साधारण ३० लाखांचा खर्च येणार आहे. एकूण पालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याने याच्या दुरुस्तीवर

उल्हासनगर : पावसाळ्यात पडलेल्या वडवली पुलावर साधारण ३० लाखांचा खर्च येणार आहे. एकूण पालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याने याच्या दुरुस्तीवर खर्च न करता नवीन पूल बांधला जाईल. दिवाळीनंतर कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिली. यासाठी सव्वादोन कोटी खर्च येणार असून वर्षभरात पूर्ण होईल, असा दावा त्यांनी केला. दरम्यान, येथील नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून पर्यायी व्यवस्था केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.मागील महिन्यात हा पूल कोसळल्याने येथील गावांचा संपर्क तुटला. नागरिक जीव मुठीत घेऊन या तुटलेल्या पुलावरून ये-जा करत आहेत. शालेय विद्यार्थीही येथून जात असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वालधुनी नदीपलीकडे वडवली गाव आहे. गावाला जाण्यासाठी अंबरनाथहून मोठा, तर उल्हासनगरहून लहान पूल आहे. ३० वर्षांपूर्वी बांधलेला हा पूल धोकादायक झाल्यामुळे नवीन पुलाची मागणी माजी नगरसेविका सुमन शेळके व उपमहापौर पंचशीला पवार यांनी पालिकेकडे वारंवार केली होती. दोन वर्षांपूर्वी नवीन पुलाची निविदा काढली होती. मात्र, कंत्राटदारच मिळाला नाही. ज्या कंत्राटदाराला पुलाचे काम मिळाले, त्याने अद्यापही काम सुरू केले नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. नवीन पुलाच्या उभारणीला एका वर्षापेक्षा जास्त कालावधी लागणार असल्याने पर्यायी पादचारी पूल किंवा अर्धवट कोसळलेल्या पुलाच्या दुरुस्तीची मागणी पवार यांनी पालिकेकडे लावून धरली. गेल्या महासभेत पुलाच्या दुरुस्तीबाबत पीठासीन अधिकाऱ्यांनी आयुक्तांना दुरुस्तीचे आदेश दिले. वडवली पुलाच्या दुरुस्तीबाबतचा अहवाल पालिकेने नाखवा कंपनीकडे मागितला होता. कंपनीच्या पथकाने पुलाचे निरीक्षण केल्यावर दुरुस्ती सूचवून ३० लाखांचा प्रस्ताव सादर केला.