शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
5
Irani Cup 2025 : मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
6
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
7
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
8
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
9
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
10
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
11
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
12
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
13
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
14
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
15
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
16
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
17
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
18
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
19
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
20
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?

स्मार्ट ठाण्याचा निवडणूक विभाग ढेपाळला

By admin | Updated: February 10, 2017 04:14 IST

ठाणे शहर ‘स्मार्ट सिटी’ करण्याकरिता चकचकीत प्रेझेंटेशन करणारे महापालिका प्रशासन निवडणुकीच्या कामात पार ढेपाळले आहे

ठाणे : ठाणे शहर ‘स्मार्ट सिटी’ करण्याकरिता चकचकीत प्रेझेंटेशन करणारे महापालिका प्रशासन निवडणुकीच्या कामात पार ढेपाळले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपून दोन दिवस उलटल्यानंतर निवडणूक विभागाकडून आॅनलाइन यादी अपलोड झाली. एकाही उमेदवाराचे शपथपत्र आॅनलाइन दिसत नाही. भाजपाने अनेक गुन्हेगारांना पक्षात प्रवेश दिलेला असल्याने त्यांच्यासंबंधीची ही माहिती मतदारांपर्यंत जाऊ नये, याकरिता कुणी अप्रत्यक्ष हातभार लावत आहे किंवा काय, अशी कुजबूज आहे.ठाणे शहर सहा महिन्यांत वायफायने कनेक्ट केले जाणार, पेपरलेस कारभार सुरू होणार, पालिकेच्या कामाचे कॉर्पोरेटायझेशन केले जाणार, अशा लंब्याचौड्या बाता मारल्या जात असल्या तरी निवडणूक विभागातील अनागोंदी, अनास्था पाहिल्यावर राजकीय पक्षांचे नेते, पत्रकार आणि मतदार कपाळावर हात मारून घेत आहेत. केवळ ब्लेझर घालून मिरवले म्हणजे महापालिकेचा कारभार कॉर्पोरेट दर्जाचा होत नाही, याचा धडा महापालिकेला मिळाला असेल, अशी टीका आता सुरू आहे.निवडणुकीच्या रिंगणात नेमके किती उमेदवार आहेत, कोणत्या पक्षाचे किती उमेदवार बाद झाले, कोणी अर्ज मागे घेतले, याची माहिती अद्यापही पूर्णपणे पालिकेच्या वेबसाइटवर दिसत नाही. गुरुवारी सायंकाळी उमेदवारांची अंतिम यादी पालिकेने वेबसाइटवर रडतखडत अपलोड केली असून त्याची संगती लागत नाही. एकूणच आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय, अशीच काहीशी गत पालिकेची झालेली आहे.दोन दिवसांपूर्वी निवडणुकीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या वेळेस पालिकेच्या याच हायफाय यंत्रणेचा पुरता बोजवारा उडाल्याचे दिसून आले. त्यामुळे पालिकेच्या या नियोजनशून्य कारभाराचा अनुभव विविध अधिकाऱ्यांनी घेतला आहे. आपल्या धडाकेबाज निर्णयांकरिता ओळखले जाणारे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडून संबंधितांवर कडक कारवाई का होत नाही, असा सवाल अधिकारी करू लागले आहेत. (प्रतिनिधी)