शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

‘निसर्ग’मुळे महावितरणचे सव्वा कोटीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 12:52 AM

ठाणे ग्रामीणमध्ये फटका : १६८ खांब, ३२ किमी वीजवाहिन्या जमीनदोस्त

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : अतितीव्र निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा महावितरणच्या कल्याण परिमंडळाला बसला असून, त्यामुळे सुमारे सव्वा कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या वादळात १६८ विजेचे खांब, आठ रोहित्र व ३२ किलोमीटरच्या वीजवाहिन्या जमीनदोस्त झाल्या आहेत. युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करून जवळपास सर्व भागांतील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश आले आहे.कल्याण मंडळ - १ कार्यालयांतर्गत डोंबिवली, कल्याण पूर्व आणि पश्चिम भागांत उच्चदाब वाहिनीचे आठ खांब व आठ किलोमीटर वीजतारा, लघुदाब वाहिनीचे आठ खांब व ५.३ किलोमीटर वीजतारा जमीनदोस्त झाल्या तर, सात रोहित्र नादुरुस्त झाले. कल्याण मंडळ - २ अंतर्गत उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, शहापूर, टिटवाळा व ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उच्चदाबाचे ४५ खांब व आठ किमी वीजतारा, लघुदाब वाहिनीचे ७८ खांब व सात किलोमीटर वीजतारा तसेच आठ रोहित्र कोसळण्यासोबतच १० रोहित्र नादुरुस्त झाले.आपत्तीच्या या काळात मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल, अधीक्षक अभियंते सुनील काकडे, धर्मराज पेठकर, मंदार अत्रे (प्रभारी), किरण नागावकर या प्रमुख अधिकाऱ्यांसह सर्व कार्यकारी अभियंते, अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदाराचे कामगार फिल्डवर कार्यरत होते. त्यामुळे अडचणीच्या काळातही कमी कालावधीत वीजपुरवठा सुरळीत करणे शक्य झाल्याचा दावा महावितरणने प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला आहे.वसई, पालघरमध्येही मोठे नुकसानवसई मंडळांतर्गत वसई, विरार, वाडा, नालासोपारा, आचोळे भागात उच्चदाब वाहिनीचे पाच खांब व १.२ किलोमीटर वीजवाहिन्या, लघुदाब वाहिनीचे २३ खांब व तीन किमी वीजवाहिन्या पडल्या असून, ११ रोहित्र नादुरुस्त झाले. पालघर मंडळांतर्गत पालघर, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, बोईसर भागात लघुदाब वाहिनीचा एक खांब व ०.२ किमी वीजवाहिन्या जमीनदोस्त झाल्या, तर दोन रोहित्र नादुरुस्त झाले. याशिवाय, परिमंडळात सव्वा किलोमीटर भूमिगत वीजवाहिन्या नादुरुस्त झाल्या.