शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

वाढवणप्रकरणी खासदारांची गोची

By admin | Updated: June 25, 2016 01:25 IST

वाढवण बंदर रद्द करण्यासंदर्भातले वाढवण बंदर संघर्ष समितीचे निवेदन मी वाचले असून त्याचा नीट अभ्यासही केला आहे.

पालघर : वाढवण बंदर रद्द करण्यासंदर्भातले वाढवण बंदर संघर्ष समितीचे निवेदन मी वाचले असून त्याचा नीट अभ्यासही केला आहे. परंतु या बंदरामुळे कुठलेही भूसंपादन होणार नसून उलट या बंदर प्रकल्पामुळे विकासाची नवनवीन दालने खुली होणार असल्याचे उत्तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांना दिले आहे. त्यामुळे खासदारांची पुरती गोची झाली असून शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पाळण्यासाठी बंदराला विरोध करतात की भाजपा सरकारच्या निर्णयापुढे हतबल ठरतात, याकडे किनारपट्टीचे लक्ष लागून राहिले आहे.या बंदरामुळे मच्छीमार, बागायतदार, डायमेकर, आदिवासी, दलितांनी केलेले आंदोलन, सेनाप्रमुखाचा विरोध तसेच पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाच्या आदेशाने तात्कालीन युती सरकारला वाढवण बंदर रद्द करावे लागले होते. यामुळे किनारपट्टीवरील हजारो लोकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला होता. आम्हाला आमच्या जीवनात कोणताही हस्तक्षेप नको, असे सांगून बंदराला सर्व स्तरावरून विरोध असल्याचे संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील यांनी लोकमतला सांगितले. (प्रतिनिधी)विद्यमान युतीच्या केंद्र आणि राज्य सरकारने महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या माध्यमातून जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टबरोबर करार केला असून हे काम पूर्वी पी अँड ओ कंपनी करणार होती. ते आता जे एन पी टी ४.५ नॉटिकल मैल खोल समुद्रात करणार आहे. सदरची जागा मच्छीमारी बंदरापासून ही वेगळी असल्याने त्याचा व्यवसायावर कुठलाही परिणाम होणार नसून कोणतेही गाव विस्थापित केले जाणार नाही. फक्त बंदराला जोडणारे रस्ते थेट महामार्गाशी जोडणे एवढेच भूसंपादन केले जाणार असल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी खासदार वनगा यांच्या तक्रारी अर्जाला उत्तर देताना कळविले आहे. तर मग बंदर उभारल्यानंतर बंदरातून १३२ मिलियन टन क्षमता असणाऱ्या या बंदरातून इतक्या मालाचे आवागमन फक्त रस्त्याद्वारे होणे शक्य नसल्याने रेल्वे सेवेचे जाळेही पसरविण्यात येणार आहे. परंतु एम ओ यूमध्ये म्हटल्याप्रमाणे चौपदरी रस्ता आणि रेल्वे उभारणीसाठी जमिनी खरेदी करावी लागणार असल्याने केंद्रीय मंत्री जनतेची दिशाभूल करीत असल्याचे संघर्ष समितीचे म्हणणे आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण घोषित करण्यात आले असतानाही वाढवण बंदराचा प्रादेशिक आराखडयात समावेश करण्यात आल्याचे खासदार वनगा यांनी कळविल्यानंतर पर्यावरणाची शास्त्रीय पाहणी करून समस्यांचे निराकरण केले जाईल असे गडकरी यांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे.शासनाने सर्वोच्च न्यायालयाचे आदेश डावलून वाढवन बंदर उभारणे बेकायदेशीर ठरणार असल्याचा आक्षेप ही घेण्यात आला असताना तसेच हा भाग नैसिर्गक दगडांच्या विशिष्ट रचनेमुळे मासे विपुल प्रमाणात मिळतात. त्यामुळे बंदर अस्तित्वात आल्यास मोठमोठ्या परदेशी बोटीची वर्दळ वाढून जहाजावरील तेल, इंधन विरघळून समुद्री पर्यावरणाला धोका निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, डहाणू मासेमारी बंदर आणि तारापूर बंदर या मधील आवश्यक अंतरावर वाढवन बंदर उभारण्यात येणार आहे. तसेच जहाज आणि बंदर सुरक्षिततेबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवरील बंधने कटाक्षाने पाळली जातील, असे उत्तर गडकरी यांनी खा.वनगा यांना कळविले आहे.