शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भारताची व्यसनाधीनतेकडे वाटचाल

By admin | Updated: January 11, 2017 07:06 IST

भारत महासत्ता होऊ पाहत आहे. येत्या काळात सर्वात तरुणांचा देश म्हणून ओळखला जाईल. मात्र, या देशाला व्यसनाधीनतेची कीड लागली आहे

डोंबिवली : भारत महासत्ता होऊ पाहत आहे. येत्या काळात सर्वात तरुणांचा देश म्हणून ओळखला जाईल. मात्र, या देशाला व्यसनाधीनतेची कीड लागली आहे. त्यामुळे २०२० मध्ये जगातील सर्वाधिक व्यसनी देश भारत असेल. महासत्तेकडे जाण्यासाठी हा मोठा अडथळा असेल, असा धोका भागवताचार्य योगेश्वर उपासनी यांनी दिला. डोंबिवली कीर्तनकुल संस्था- डोंबिवली आणि मराठा हितवर्धक मंडळ- डोंबिवली यांच्यातर्फे देवर्षीनारद कीर्तन महोत्सव रविवारपासून मराठा हितवर्धक मंडळाच्या सभागृहात झाला. या वेळी व्यासपीठावर कीर्तनकुल संस्थेचे अध्यक्ष सुहासबुवा सरपोतदार, भागवताचार्य अलका मुतालिक, मराठा हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष श्रीराम चाळके, सतीश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी उपासनी बोलत होते. ते म्हणाले की, पुढच्या पिढीतील मुले उत्तम श्रवण कधी क रू शकतील का? त्यांना कीर्तनाकडे वळवण्यासाठी आम्ही कमी पडतो. मुलांचे नाते देशाशी, धर्माशी आणि संस्कृतीशी अधिक घट्ट करायला हवे आहे. नाहीतर, आमची मुले आम्हाला सांभाळत नाही, हे बोलण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही. हा सिंहावलोकनाचा काळ आहे. आता जागे झालो नाही, तर मरणापूर्वीचे सोहळे आताच साजरे करावे लागतील. हे धर्मयुद्ध आहे. त्यामुळे समाजापर्यंत पोहोचेल, असे उत्तम कार्य करूया. कीर्तनातून अनेकांना तारले जाते आणि ती जबाबदारी विश्वरूपी संतांनी आमच्यावर दिली आहे. या अलौकिक विभूतीचे आम्ही पायिक आहोत. या ठिकाणी नामजपयज्ञ व राष्ट्रधर्मयज्ञ सुरू होणार आहे. त्यातून देश, राष्ट्र व धर्माला नवी झळाळी देऊया, असेही त्यांनी सांगितले. मुतालिक म्हणाल्या की, कीर्तनाचे प्रशिक्षण देणारी शैक्षणिक संस्था काही कारणाने बंद करावी लागली. पण, त्यावेळी या परीक्षेत डोंबिवलीतील विद्यार्थी उत्तम यश मिळवीत असत. श्रोते आणि माणसे वाढवणे हे सोपे काम आहे. पण, कार्यकर्ता तयार करण्यास एक तप मेहनत घ्यावी लागते. सर्व कीर्तनकारांनी येथे येण्याची गरज आहे. त्यांना शक्य होत नसले तरी, ते आपल्या परीने समाजप्रबोधनाचे कार्य करीत आहे. व्यक्ती कोणत्याही संप्रदायाची असू द्या. तिच्यामध्ये माणुसकी हा धर्म असला पाहिजे. माणुसकीला कोणताही संप्रदाय नाही. प्रत्येक व्यक्तीने जीवनात प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी केल्या पाहिजेत. (प्रतिनिधी)