शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीविरोधात कल्याणमध्ये आंदोलने

By admin | Updated: January 10, 2017 06:27 IST

नोटाबंदीविरोधात काँग्रेसतर्फे सोमवारी सर्वत्र आंदोलन छेडण्यात आले. याचाच एक भाग म्हणून कल्याणमध्ये जिल्हा काँग्रेसने येथील शिवाजी चौकात थाळीनाद केला.

कल्याण : नोटाबंदीविरोधात काँग्रेसतर्फे सोमवारी सर्वत्र आंदोलन छेडण्यात आले. याचाच एक भाग म्हणून कल्याणमध्ये जिल्हा काँग्रेसने येथील शिवाजी चौकात थाळीनाद केला. तसेच शिवाजी चौक ते तहसील कार्यालयादरम्यान मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेधही करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसने नोटाबंदीच्या निषेधार्थ तहसील कार्यालयाबाहेर धरणे धरले.केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेण्याआधी कोणत्याही प्रकारे पूर्वनियोजन केले नाही. परिणामी लघुउद्योजक, शेतकरी आणि रोजंदारीवर काम करणारे यात पुरते भरडले गेल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. केंद्राच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध म्हणून काँग्रेसने गुरुवारीही देशपातळीवर आंदोलनाची हाक दिली होती. याचाच एक भाग म्हणून युवक काँग्रेसतर्फे कल्याणमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान, जिल्हा काँग्रेसच्या आंदोलनात शिवाजी चौकात थाळीनाद करण्यात आला. या आंदोलनाचा फटका वाहतुकीला बसल्याने अर्धा ते पाऊण तास वाहतूक पुरती खोळंबली. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना पांगवत रस्ता मोकळा केला. या वेळी काही आंदोलकांना ताब्यातही घेतले. त्यानंतर, त्यांना सोडून दिले. जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनात कल्याण-डोंबिवली शहर महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी, अनुसूचित जाती कल्याण जिल्हाध्यक्ष सुरेंद्र आढाव, माजी नगरसेवक संतोष केणे, माजी शिक्षण मंडळ उपसभापती अमित म्हात्रे यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसनेही सोमवारी राज्यव्यापी आंदोलन छेडले. कल्याणमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर धरणे धरत नोटाबंदीचा निषेध केला. या वेळी आमदार जगन्नाथ शिंदे, कल्याण जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, जे.सी. कटारिया, उदय जाधव, अर्जुनबुवा चौधरी, वंडार पाटील, युवराज पवार आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)