शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगारांचे आंदोलन

By admin | Updated: July 2, 2017 06:06 IST

ओला व सुका कचरा वेगळा गोळा करण्यासाठी एकऐवजी दोन डबे वापरावे लागत असल्याने पगार दुप्पट करण्याची मागणी करत इमारतींमधील

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : ओला व सुका कचरा वेगळा गोळा करण्यासाठी एकऐवजी दोन डबे वापरावे लागत असल्याने पगार दुप्पट करण्याची मागणी करत इमारतींमधील सफाई कामगारांनी शनिवारपासून तीन दिवसांचे ‘झाडू बंद’ आंदोलन सुरू केले. यामुळे अनेक इमारतींतील रहिवाशांच्या घरातून कचरा गोळा झाला नाही. पालिकेच्या रोजच्या कचरा उचलण्याच्या प्रमाणात ३० टक्के घट झाली. मीरा-भार्इंदरमध्ये निवासी इमारतींमध्ये दैनंदिन झाडू मारणे व घरांमधून कचरा गोळा करून तो इमारतीबाहेर ठेवण्याचे काम सफाई कामगार करत असतात. परंतु, महापालिकेने ओला व सुका कचरा वेगळा करण्याची सक्ती केल्याने आता ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी दोन वेगवेगळे डबे या कामगारांना न्यावे लागतात. अनेक उंच इमारतींमध्ये लिफ्ट असली तरी डबे वर नेण्यास वा कचरा घेत खाली येण्यासाठी जिन्याचाच वापर करावा लागतो. अनेक ठिकाणी गोळा केलेला कचरा या कामगारांनाच वेगळा करायला लावला जातो, जेणेकरून कामाची वेळ साधारण चार तासांनी वाढली आहे. श्रमही वाढला आहे. आधीच किमान वेतनाप्रमाणे या कामगारांना पगार मिळत नाही. त्यातच काम दुपटीने वाढल्याने कामगारांना पगारही दुप्पट करण्याची मागणी श्रमिक एकता संघटनेने केली आहे. संघटनेच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांना निवेदन देण्यात आले. पण, आयुक्तांकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने अखेर आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचे संघटनेचे प्रमुख अंकुश मालुसरे यांनी सांगितले. आमच्या संघटनेचे १७०० सदस्य असून झाडूबंद आंदोलनामुळे शहरातील जवळपास सर्वच इमारतींमध्ये शनिवारी कचरा उचलण्यात आलेला नाही. सोमवारपर्यंत आमचे आंदोलन चालणार आहे, असे मालुसरे म्हणाले. दरम्यान, शहरात जमावबंदी असल्याने महापालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय संघटनेला मागे घ्यावा लागला. सफाई कामगारांच्या आंदोलनामुळे अनेक इमारतींमध्ये सफाई झालेली नाही तसेच घराघरांतून कचरा उचलला गेला नाही. काहींनी घरातील कचरा खाली नेऊन टाकला. उद्या रविवार असल्याने गृहनिर्माण संस्थांमधील समित्यांच्या बैठका घेऊन यातून तोडगा काढण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.पालिकेचा तूर्तास हस्तक्षेप नाहीहा प्रश्न रहिवासी व खाजगी सफाई कामगारांचा असल्याने त्यात तूर्तास तरी पालिकेने हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले.