शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
6
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
7
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
8
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
9
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
10
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
11
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
12
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

देशातील मोठा पॉवरलूम मेगा क्लस्टर भिवंडीत उभारण्यासाठी हालचाली !ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन या प्रकल्पाविषयी सकारात्मक चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 17:20 IST

जिल्हा प्रशासनाने समृद्धी महामार्ग, जेएनपीटी, दिल्ली-मुंबई फ्रेट कॉरीडॉर यांचा विचार करून दळणवळणाच्या दृष्टीने योग्य जागेची निवड करावी. यासाठी सुमारे १५० एकर जागेची प्राथमिक आवश्यकता आहे. यामध्ये कॉमन फेसिलिटी सेंटर, पॉवरलूम प्रोसेसिंग, यार्न मार्केट, वर्क शेड्स आदींची आवश्यकता भासणार आहे. याशिवाय याठिकाणी वस्त्रोद्योगाशी संबंधित कौशल्य विकास केंद्रे असतील. पॉवरलूम आधुनिकीकरण योजना याठिकाणी राबविण्यात येतील. सुताचा पुरवठा ते कापडाची निर्यात या संपूर्ण पक्रियेसाठी कुणावरही अवलंबून राहण्याची गरज पडणार नसल्याची सकारात्मक चर्चा

ठळक मुद्देप्रथम १५० एकर भूखंडावर हा पॉवरलूम मेगा क्लस्टर उभारला जाणारहबसाठी जमीन उपलब्धतेसह अन्य गोष्टींसाठी प्राध्यक्रम देण्याचे आश्वासन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकरयामध्ये कॉमन फेसिलिटी सेंटर, पॉवरलूम प्रोसेसिंग, यार्न मार्केट, वर्क शेड्स आदीं

ठाणे : देशातील सर्वात मोठे पॉवरलूम मेगा क्लस्टर भिवंडी येथे उभारण्याच्या दृष्टीने जोरदार पावले उचलण्यात आली आहेत. मंगळवारी वस्त्रोद्योग सचिव अतुल पाटणे यांनी भिवंडी पॉवरलूम असोसिएशनच्या सदस्यांसमवेत ठाणेजिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन या प्रकल्पाविषयी सकारात्मक चर्चा केली. सुमारे प्रथम १५० एकर भूखंडावर हा पॉवरलूम मेगा क्लस्टर उभारला जाणार आहे. मोठ्याप्रमाणात रोजगार उपलब्ध होणाऱ्या या हबसाठी जमीन उपलब्धतेसह अन्य गोष्टींसाठी प्राध्यक्रम देण्याचे आश्वासन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी यावेळी दिले.पॉवरलूम मेगा क्लस्टर उभारण्यासाठी आयोजित केलेल्या या बैठकीत भिवंडीत निर्यात प्रोत्साहनसंदर्भात एक कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने सुरु करण्यासाठी ही यावेळी चर्चा झाली. या बैठकीत वस्त्रोद्योग संचालक माधवी खोडे यांनी देखील या हबची माहिती देऊन आजच्या स्थितीचे महत्त्व पठवून दिले. एमआयडीसी स्पेशल पर्पज व्हेईकल करून त्या माध्यमातून या महत्वाकांक्षी प्रकल्पाची उभारणी झाल्यास विद्युत मंडळ, प्रदूषण नियंत्रण, महानगरपालिका, महसूल विभाग या व इतर शासकीय संस्थांशी समन्वय साधणे अधिक सोयीस्कर होईल असे पाटणे यांनी यावेळी स्पष्ट केले.जिल्हा प्रशासनाने समृद्धी महामार्ग, जेएनपीटी, दिल्ली-मुंबई फ्रेट कॉरीडॉर यांचा विचार करून दळणवळणाच्या दृष्टीने योग्य जागेची निवड करावी. यासाठी सुमारे १५० एकर जागेची प्राथमिक आवश्यकता आहे. यामध्ये कॉमन फेसिलिटी सेंटर, पॉवरलूम प्रोसेसिंग, यार्न मार्केट, वर्क शेड्स आदींची आवश्यकता भासणार आहे. याशिवाय याठिकाणी वस्त्रोद्योगाशी संबंधित कौशल्य विकास केंद्रे असतील. पॉवरलूम आधुनिकीकरण योजना याठिकाणी राबविण्यात येतील. सुताचा पुरवठा ते कापडाची निर्यात या संपूर्ण पक्रियेसाठी कुणावरही अवलंबून राहण्याची गरज पडणार नसल्याची सकारात्मक चर्चा या बैठकीत झाली.* कालबध्द रीतीने कार्यवाही व्हावी -भिवंडी येथे सुमारे सात लाख पॉवरलूम्स आहेत. त्यात दहा लाखांपेक्षा जास्त कामगार थेट रोजगार मिळवितात अप्रत्यक्षरित्या ४० लाख लोकांचा जीवन चिरतार्थ या उद्योगावर आहे. देशातील एकूण यंत्रमागांपैकी ५० टक्के यंत्रमाग महाराष्ट्रात आहेत. त्यात भिवंडीचा सर्वात अधिक वाटत आहे. पॉवरलूम संस्थांचे बळकटीकरण, कामगारांचे कल्याण मंडळ, यंत्रमाग संजीवनी योजना, परकीय गुंतवणूक आदी माध्यमातून या क्षेत्राच्या समस्या दूर करण्यात येत आहेत. भिवंडी येथे मेगा क्लस्टरच्या उभारणीने या भागाचा चेहरा मोहरा बदलेल मात्र कालबध्द रीतीने याची कार्यवाही व्हावी, अशी मागणी या बैठकीस उपस्थित असलेल्या प्रतिनिधींनी केली.भिवंडीतील पायाभूत सुविधा, रस्ते, शौचालये आदी उपलब्ध करणे या बाबींवर देखील लक्ष केंद्रित करावे असे भिवंडी पद्मानगर पावरलूम व्हीवर्सचे अध्यक्ष पुरु षोत्तम वंगा, यांनी सांगितले. माजी आमदार माजी आमदार रशीद ताहीर मोमीन यांनी देखील वीज वितरण कंपनीच्या ( टोरेंट) समस्या मांडल्या. शहरातील रस्ते, पूल, स्वच्छता याबाबतीत प्राधान्याने कारवाई सुरु असून या मेगा क्लस्टरच्या दृष्टीने पूर्णपणे सहकार्य केले जाईल असे भिवंडी महापालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी सांगितले. सोयी सुविधांसंदर्भात सर्व प्रतिनिधींसमवेत ५ सप्टेंबर रोजी प्रांत कार्यालयात चर्चा करण्यात येईल भिवंडी प्रांत अधिकारी मोहन नळदकर यांनी सांगितले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसीचे अधिकारी आदींनी देखील आपली मते मांडली.

 

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी