शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

मद्यधुंद आरटीओ एजंटच्या गाडीची दुचाकीला धडक

By admin | Updated: December 1, 2015 09:10 IST

मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून एका दुचाकीला धडक देणाऱ्या विष्णू मुंढे (२४) या आरटीओ एजंटला नागरिकांनी चांगलाच ‘प्रसाद’ देऊन नौपाडा पोलिसांच्या स्वाधीन केले.

ठाणे : मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून एका दुचाकीला धडक देणाऱ्या विष्णू मुंढे (२४) या आरटीओ एजंटला नागरिकांनी चांगलाच ‘प्रसाद’ देऊन नौपाडा पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गाडी घेऊन पळून जाणाऱ्या त्याच्या साथीदाराचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.समतानगरमधील ‘रजनीगंधा’ सोसायटीमध्ये राहणारा विष्णू २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी आपल्या साथीदारासह जात होता. भन्नाट वेगात असलेली ही गाडी ‘ओपन हाऊस’पासून कर्णकर्कश हॉर्नचा आवाज करीत सुसाट जात होती. त्याने हरिनिवास सर्कलजवळ पत्नी आणि मुलासह जाणाऱ्या अमित लिम्बे यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात ते सुदैवाने बचावले. याचा जाब काही ज्येष्ठ नागरिकांनी विचारल्यावर मुंढेने त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. शिवाय, गाडीत आरटीओ अधिकाऱ्याची टोपी असल्याचे सांगून त्याने दमबाजी करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याला जमावाने बेदम चोप दिला. त्याच वेळी त्याच्यासोबत गाडीत असलेल्याने कार घेऊन पलायन केले. आता ती गाडी आणि टोपी कोणाची याबाबतचा तपास सुरू असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले. मुंढेला वाचविण्यासाठी त्याच्या अन्य एका साथीदाराने पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘तो’ फोन लावणाऱ्या विष्णूच्या दुसऱ्या एका साथीदाराचा मोबाइलही गुन्हा दाखल होईपर्यंत पोलिसांनी जप्त केला होता. (प्रतिनिधी)