शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आईनेच दिले चोरीचे ‘बाळकडू’; संपूर्ण कुटुंबच चोरीमध्ये गुंतल्याची धक्कादायक माहिती उघड

By जितेंद्र कालेकर | Updated: July 31, 2025 10:03 IST

११० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या पडताळणीतून या चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली.

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे :  नौपाडा येथील घरफोडीचा तपास करताना संपूर्ण कुटुंबच चोरीमध्ये गुंतल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. पूजा गुप्ता ऊर्फ पूजा प्रकाश आव्हाड (वय ४५) हीच गुन्ह्याची मुख्य सूत्रधार असून, तिचा पती, बहीण आणि मुलेही चोरीचा ‘उद्योग’  करीत असल्याचे आढळले. गणेश गुप्ता ऊर्फ गणेश आव्हाड (२०) या तिच्या मुलाला अटक केली. चाैकशीत आईकडून त्याला चाेरीचे बाळकडू मिळाल्याचे समाेर आले.

११० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या पडताळणीतून या चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली.  एका लहान मुलीच्या पाठीवरील बॅगेतून घरफोडीची सामग्री काढताना आढळल्यानंतर पोलिसांनी दिवा परिसरात पाळत ठेवून गणेशला अटक केली. त्याच्याकडून चोरीतील १० लाख ९९ हजारांचा मुद्देमालही हस्तगत केला. त्याने आतापर्यंत केलेल्या चोरीच्या १० गुन्ह्यांची कबुलीही दिली.

ठाण्यातील अतुल मराठे यांच्या घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सात लाख ९९ हजारांचा ऐवज १४ जुलैला चोरीला गेला होता. सहायक आयुक्त प्रिया ढाकणे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मंगेश भांगे यांच्या पथकाने अनेक सीसीटीव्हीच्या फुटेजची तपासणी केली. 

मुलीच्या दप्तरात हत्यारे

पूजाच्या पहिल्या पतीचा मृत्यू झाला. दुसरा पती आणि बहीणही चोरी करण्यात माहीर. पूजाला पाच वर्षांची मुलगी, सात, १७ आणि २० वर्षांची तीन मुले. या तिघांचाही ती चोऱ्यांसाठी खुबीने वापर करून घेते. मुलीच्या दप्तरामध्ये ती चोरीची सामग्री ठेवत असे. 

पूजाची मात्र हुलकावणी

सूत्रधार पूजाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर हल्ला करणे किंवा स्वत:वरच दगडाने हल्ला करून घेणे तसेच स्वत:चे कपडे फाडणे, असे प्रकारही करून ती पोलिसांना गुंगारा देत असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक भांगे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी