शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

बदलापुरातील बहुसंख्य एटीएममध्ये खडखडाट

By admin | Updated: May 5, 2017 05:48 IST

बदलापूरमधील एटीएम मशीनमध्ये गेल्या महिनाभरापासून रोख रकमेची तीव्र चणचण भासत असल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप

 बदलापूर : बदलापूरमधील एटीएम मशीनमध्ये गेल्या महिनाभरापासून रोख रकमेची तीव्र चणचण भासत असल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या महिनाभरापासून एटीएम मशीनमध्ये पैसेच नसल्याने लोक एटीएममध्ये वरचेवर जातात. मात्र, खाली हाताने त्यांना परतावे लागते. एटीएमची अखंड सेवा पुरवण्यात सर्वच बँका कमी पडत आहेत. एटीएममध्ये पैसे मिळत नसल्याने बँकेतून पैसे काढण्याकरिता रांगा लावण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. बदलापूर पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागांत मिळून जवळपास ८० च्या वर एटीएम आहेत. त्यात राष्ट्रीयीकृत बँकांसह सहकारी बॅँकांच्या एटीएमचाही समावेश आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सर्वच एटीएममध्ये पैशांचा तुटवडा जाणवत आहे. काही बँकांच्या एटीएमवर ‘रोख रक्कम नसल्याने मशीन बंद’ असल्याचे फलक पाहायला मिळतात. अनेक एटीएमना पूर्णत: टाळे लावले आहे. शहरातील एटीएममध्येही पैशांचा खडखडाट आहे. यामुळे बँकांमधील गर्दी वाढली आहे. ज्यांना तातडीने रकमेची गरज आहे, त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. (प्रतिनिधी)