शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

मॉर्निंग क्लबची राज अकादमीवर १५८ धावांनी मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:38 IST

ठाणे : स्पोर्टिंग क्लब्स कमिटी, ठाणे आयोजित ठाणे महानगरपालिका क्षेत्र मर्यादित ३४ व्या डॉक्टर श्रीधर दत्तात्रेय देशपांडे स्मृती वासंतिक ...

ठाणे : स्पोर्टिंग क्लब्स कमिटी, ठाणे आयोजित ठाणे महानगरपालिका क्षेत्र मर्यादित ३४ व्या डॉक्टर श्रीधर दत्तात्रेय देशपांडे स्मृती वासंतिक टी-२० क्रिकेट स्पर्धेस सेंट्रल मैदानावर प्राध्यापिका अनघा देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला. शुभारंभाच्या सामन्यात मॉर्निंग क्रिकेट क्लबने राज अकादमीचा तब्बल १५८ धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली.

विजयी संघातर्फे विकी पाटील ९४, किरण नायडू ५९, पंकज पाटील ३४, फिरोज हाश्मी १३ धावांत तीन बळी, तर स्पर्धेच्या इतिहासातील पहिली महिला खेळाडू दिया इना हिने १३ धावांत एक बळी अशी अष्टपैलू कामगिरी नोंदविली. यावेळी मुंबईच्या स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे स्पोर्टिंग क्लबचे क्रिकेटपटू मुकुंद सातघरे यांचा क्लबचे अध्यक्ष डॉक्टर राजेश मढवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी रणजीपटू संदीप दहाड, अध्यक्ष डॉक्टर राजेश मढवी, अतुल फणसे, सुशील म्हापुस्कर, किशोर ओवळेकर प्रल्हाद नाखवा, शशी नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यवाह दिलीप धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले.

चौकट

धावफलक : मॉर्निंग क्रिकेट क्लब २० षटकांत पाच बाद २४७ (विकी पाटील ९४, किरण नायडू ५९, पंकज पाटील ३४, रियाझ वरेकर ४-०-४४-२) विजयी वि. राज अकादमी १५.३ षटकांत ८९ (अथर्व मिंडे २१, मोहित सिंग २-०-१३-२, फिरोझ हाश्मी ४-२-१३-२). पंच : गुरू कदम- राजन कसबे. गुणलेखक : निखिल पुढारी

-----------------