शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

आणखी क्रीडासंकुले ठेकेदारांच्या घशात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 01:49 IST

ढोकाळीचे शरदचंद्र पवार क्रीडासंकुल, कोरमजवळील शहीद तुकाराम ओंबाळे बँडमिंटन कोर्ट कंत्राटदारांना आंदण देण्याच्या वेगवान हालचाली पालिकेने सुरू केल्याने क्रीडाक्षेत्रात नाराजी आहे

ठाणे : ढोकाळीचे शरदचंद्र पवार क्रीडासंकुल, कोरमजवळील शहीद तुकाराम ओंबाळे बँडमिंटन कोर्ट कंत्राटदारांना आंदण देण्याच्या वेगवान हालचाली पालिकेने सुरू केल्याने क्रीडाक्षेत्रात नाराजी आहे. ही क्रीडासंकुले चालवणे क्रीडा विभागाच्या आवाक्यात नसल्याचे कारण देत त्यांच्या खासगीकरणाचा घाट घातला जात आहे. या पद्धतीने क्रीडाविषयक वास्तु कंत्राटदारांकडे सोपवायच्या असतील, तर त्यासाठीचे धोरण पालिकेने आधी ठरवायला हवे. पण मर्जीतील ठेकेदारांना प्रायोगिक तत्त्वावर सोपवण्याची प्रथा पाडली जात असून त्यातून काही जणांवर मेहेरजनर सुरू असल्याची तक्रार आहे.पालिकेने ४० कोटी खर्च करून उभारलेले कौसा येथील स्टेडियम कोणत्याही निविदा प्रक्रियेशिवाय खासगी कंत्राटदाराला देण्यात आले. त्याचे खासगीकरण करायचे असेल किंवा ते ठेकेदाराला चालवायला द्यायचे असेल तर सरकारी नियमानुसार त्यासाठी निविदा काढणे गरजेचे आहे. त्यासाठी स्वारस्य अभिव्यक्तीचे देकार पालिकेने मागवणे अपेक्षित होते. पण तसे न करता फोएनिक्स स्पोर्टस अकादमीला ते प्रायोगिक तत्त्वावर चालवण्यास देण्यात आले. ही प्रक्रि या बेकायदा असल्याचे आरोप झाले. त्यानंतर त्याबाबत धोरण ठरवावे आणि अशापध्दतीने क्र ीडासंकुले चालवण्यास देऊ नयेत, असे पत्र भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी दिले होते. त्यानंतरही मुंब्य्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सभागृहात घातलेला गोंधळ आणि राजकीय दबावामुळे हे स्टेडियम ‘प्रायोगिक तत्त्वावर’ कंत्राटदाराकडे गेले. त्याचपद्धतीने आता ढोकाळीचे शरदचंद्र पवार क्र ीडासंकुल आणि ओंबाळे बॅडमिंटन कोर्टही मर्जीतील ठेकेदारांना देण्याचा घाट घातला जात असल्याची पालिका वर्तुळातील माहिती आहे. प्रशासनातर्फे तसे प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी मांडण्यात आले आहेत. पवार स्टेडियम मे. संकल्प सेवा मंडळाला दिले जाणार आहे. राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या एका नगरसेवकाचे हे मंडळ असल्याची चर्चा आहे. त्या मंडळाला क्र ीडा क्षेत्रातील कामाचा मोठा अनुभव नाही. ओंबाळे बॅडमिंटन कोर्ट कोणाला चालवायला देणार त्याची माहिती अजून उपलब्ध नाही.स्वारस्य अभिव्यक्ती देकारांचे धोरण (एक्स्प्रेशन आॅफ इंटरेस्ट) तयार झाले तर अशा वास्तु राजकीय-प्रशासकीय मर्जीतील ठेकेदारांना प्रायोगिक तत्त्वावर सोपवता येणार नाहीत. त्यामुळेच धोरण न ठरवता कंत्राटदारांसाठी घाई सुरू असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. धोरण न ठरवता खासगीकरण झाले तरदर्जा, क्रीडासुविधा, आकारले जाणारे दर, तेथील स्पर्धा, खेळाडू घडवण्याची प्रक्रिया यातील कशावरही नियंत्रण राहणार नाही, असा क्रीडाप्रेमींचा आक्षेप आहे.