शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

जास्त वैयक्तिक शौचालये

By admin | Updated: May 14, 2016 00:38 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबवण्यात येणाऱ्या मोहिमेत हगणदारीमुक्त शहर तसेच प्रत्येक नागरिकास वैयक्तिक शौचालय बांधून देण्याचे उद्दिष्ट प्रत्येक पालिकांना देण्यात आले होते.

अंबरनाथ : स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबवण्यात येणाऱ्या मोहिमेत हगणदारीमुक्त शहर तसेच प्रत्येक नागरिकास वैयक्तिक शौचालय बांधून देण्याचे उद्दिष्ट प्रत्येक पालिकांना देण्यात आले होते. अंबरनाथ पालिकेने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त शौचालयांची निर्मिती केली आहे. त्यामुळे वैयक्तिक शौचालयांचे उद्दिष्ट पूर्ण करणारी अंबरनाथ पालिका ही राज्यातील पहिली पालिका ठरली आहे.या योजनेंतर्गत अंबरनाथ शहर पालिकेने जास्तीतजास्त नागरिकांना वैयक्तिक शौचालयासाठी अर्ज करण्याची विनंती केली होती. त्यानुसार, शहरातील १ हजार ९१५ कुटुंबांनी या शौचालयांसाठी अर्ज केले होते. या अर्जांची छाननी केल्यावर त्यातील पात्र लाभार्थ्यांना शौचालयाचा निधी देऊन कामास सुरुवातही केली होती. त्यातील १ हजार २४७ कुटुंबीयांनी निधीचा विनियोग करत शौचालयांची उभारणी केली. प्रत्येक शौचालयासाठी पालिकेकडून प्रत्येकी ३ तर राज्य शासनाकडून १२ हजारांचा निधी देण्यात आला. या १५ हजारांमध्ये जास्तीतजास्त नागरिकांनी शौचालय उभारण्याचा प्रयत्न केला. दिलेल्या निधीचा योग्य वापर होतोय की नाही, याची चाचपणी करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले होते. प्रत्येक लाभार्थ्याला भेटून काम करून घेण्यासाठी हे पथक प्रयत्न करत होते. ज्या कुटुंबीयांना अडचणी येत होत्या, त्या दूर करण्याचाही प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)