शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदरमध्ये मराठा सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी लागणार आणखी दिवस 

By धीरज परब | Updated: January 30, 2024 19:32 IST

मागासवर्ग आयोगाने दिलेल्या मोबाईल मध्ये ऍप डाउनलोड करून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करायचे असून पालिकेचे सुमारे ५५० ते ६०० कर्मचारी सर्वेक्षणाच्या कामी नियुक्त करण्यात आले आहे

मीरारोड - मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मराठा समाजासह सर्व खुल्या वर्गातील कुटुंबाचे सर्वेक्षण ३१ जानेवारी पर्यंत पूर्ण करण्याचे शासन आदेश असले तरी मीरा भाईंदर मध्ये मात्र ३० जानेवारी पर्यंत जेमतेम २५ ते ३० टक्के प्रमाणात सर्वेक्षण झाल्याने ते पूर्ण करण्यास आणखी दिवस लागणार आहेत. 

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे लोण मुंबई पर्यंत पोहचण्या आधीच राज्य शासनाने  मराठा आरक्षणा  बाबत निर्णय घेतले . राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशा नुसार मराठा व खुल्या वर्गातील कुटुंबियांचे सर्वेक्षण करण्यासाठी २३ ते ३१ जानेवारी अशी मुदत देण्यात आली होती . एकूण ऍप व त्यात माहिती भरून घेणे आदी साठी सुमारे २ जीबी मेमरी असावी असे निर्देश देखील राज्य मागासवर्ग आयोगाने दिले आहेत 

मीरा भाईंदर महापालिकेत सुमारे १३५० कायम स्वरूपी तर १८० मानधनवरील कर्मचारी आहेत . या शिवाय ठेक्याने घेतलेले कर्मचारी सुद्धा मोठ्या संख्येने आहेत . महापालिकेत मराठा व खुला वर्गचे सर्वेक्षण साठी आयुक्त संजय काटकर यांनी उपायुक्त मारुती गायकवाड यांची नियुक्ती केली आहे . सदर सर्वेक्षण प्रभाग समिती निहाय सुरु करण्यात आले आहे . 

यासाठी मागासवर्ग आयोगाने दिलेल्या मोबाईल मध्ये ऍप डाउनलोड करून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करायचे असून पालिकेचे सुमारे ५५० ते ६०० कर्मचारी सर्वेक्षणाच्या कामी नियुक्त करण्यात आले आहे . निवासी मालमत्ता नुसार हे सर्वेक्षण पालिका करत असून मंगळवार ३० जानेवारी पर्यंत सुमारे ७० ते ८० हजार घरांचे सर्वेक्षण करण्यात आल्याचे पालिका सुत्रांकडून सांगण्यात आले .  सुरवातीला काही कर्मचाऱ्यांनी आपणास मोबाईल मधील ऍप वापरता येत नाही , त्यात माहिती भरणे जमत नाही अशी कारणे पुढे केली होती . सर्वेक्षणात मराठा समजाचे वा कोणत्याही खुला वर्गातील कुटुंब सापडल्यास ऍप मध्ये सर्व माहिती भरून घेण्यासाठी अर्धा ते पाऊण तास जातो. कारण सुमारे १८१ प्रश्नावली असून त्यात अनेक पर्यायांचा समावेश आहे . सर्वेक्षणात सहीचा फोटो अपलोड करावा लागतो. 

माहितीचे स्वरूप खूपच व्यापक असल्याने तसेच मराठाच नव्हे तर अन्य खुल्या वर्गातील लोकांची माहिती सुद्धा ऍप मध्ये भरायची असल्याने एकूणच ही प्रक्रिया पूर्ण करण्यात वेळ लागतोय . त्यातच पालिकेने नेमलेले कर्मचारी अपुरे आहे . शहरातील सुशिक्षित नागरिक , तरुण वा महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक आदींची मानधनावर नियुक्ती करून सर्वेक्षण साठी नेमले असते तर सर्वेक्षण ३१ जानेवारी पर्यंत कदाचित पूर्ण करता आले असते . परंतु पालिकेचे एकूणच काम पाहता सर्वेक्षण ३१ जानेवारी पर्यंत पूर्ण होणे अशक्य होत असल्याने मुदतवाढ मागण्याची शक्यता आहे . या प्रकरणी नोडल अधिकारी मारुती गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॉल घेतला नाही .