शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

मॅरेथॉनमध्ये मोरगा,उगले विजयी

By admin | Updated: September 26, 2016 01:53 IST

या तालुक्यातील माकुणसार येथे रविवारी सकाळी झालेली मॅरेथॉन ज्ञानेश्वर मोरगा व दिव्या उगले यांनी जिंकली. स्पोर्टक्लबच्यावतीने तिचे आयोजन केले गेले होते.

पालघर : या तालुक्यातील माकुणसार येथे रविवारी सकाळी झालेली मॅरेथॉन ज्ञानेश्वर मोरगा व दिव्या उगले यांनी जिंकली. स्पोर्टक्लबच्यावतीने तिचे आयोजन केले गेले होते. सकाळी ८ वाजता सुरु झालेली ही स्पर्धा ११ किमी अंतराची होती. जिल्ह्यातील स्पर्धकांनी मोठ्या संख्येने तिच्यात सहभाग घेतला, पावसाने हजेरी लावली तरी त्याचा कोणताही परिणाम स्पर्धकांच्या उत्साहावर झाला नाही.मुख्य मिनी मॅरेथॉन, वरिष्ठ नागरिक आणि महिलांसाठी अशा विविध गटात ही स्पर्धा घेण्यात आली. ११ किमीचे अंतर ज्ञानेश्वर विठ्ठल मोरगा रा. विक्र मगड यांनी ३७ मि. ३७ सेकंदात पूर्ण करून प्रथम क्र मांक पटकावला. महिला गटामध्ये दिव्या सुरेश उगले रा. सायवन हिने ५३ मि.०७ सेकंदात पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकावला. ज्येष्ठ नागरिकांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत अनंत सदाशिव म्हात्रे रा. माकुणसार हे प्रथम आले. स्पर्धेच्या बक्षिस वितरण सभारंभाला पालघर जिल्हा अ‍ॅथलेटिक असोशिएशनचे अध्यक्ष आणि आमदार क्षितिज ठाकुर प्रमुख पाहुणे म्हणून उपास्थित होते, तसेच बोईसरचे आमदार विलास तरे, पालघर विधानसभा आमदार अमित घोडा, उपजिल्हाप्रमुख आणि माजी पं. समिती सदस्य वसंत चव्हाण, यंग स्टार सफाळेचे अध्यक्ष राजेश म्हात्रे, विक्रमगड कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष नीलेश सांबरे आणि पालघर विभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक निमित गोयल आदी मान्यवर उपस्थित होते.आमदार क्षितिज ठाकूर यांनी स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेणाऱ्या स्पोर्ट्स क्लबच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले, तसेच जास्तीत जास्त तरु ण तरु णींनी खेळामध्ये सहभाग घेण्याचे आवाहन केले आणि यशस्वी स्पर्धकांना बक्षिस वितरित करून त्यांचे अभिनंदन केले. कार्यकर्माचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. (वार्ताहर)