शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोपलवार प्रकरण; मांगलेकडे मिळाले चार हजार कॉल रेकॉर्ड्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 03:46 IST

सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्याकडून खंडणी उकळणाºया सतीश मांगलेच्या लॅपटॉपमधून तब्बल ४ हजार कॉल्स

राजू ओढे ठाणे : सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्याकडून खंडणी उकळणाºया सतीश मांगलेच्या लॅपटॉपमधून तब्बल ४ हजार कॉल्स रेकॉडर््स पोलिसांना मिळाले आहेत. हे रेकॉर्ड्स कुणाचे आहेत, मांगलेने आणखी कुणाकुणाकडून खंडणी उकळली, हे तपास अधिकारी आता पडताळून पाहणार आहेत.रस्ते विकास महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांची लाचेची मागणी करणारी ध्वनिफीत परत करण्यासाठी एक कोटी रुपयांची खंडणी घेताना खासगी डिटेक्टिव्ह सतीश मांगले, त्याची दुसरी पत्नी मराठी अभिनेत्री श्रद्धा यांना ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने गत गुरुवारी अटक केली होती. मोपलवार यांच्याकडून खंडणी उकळण्यासाठी मांगलेने त्यांचे कॉल रेकॉर्ड केले होते. असेच उद्योग मांगलेने इतरांसोबतही केले असतील, असा संशय पोलिसांना होता. डोंबिवली येथून अटक करताना पोलिसांनी मांगलेचा लॅपटॉप, मोबाइल फोन व इतर साहित्य हस्तगत केले. पोलिसांना त्यात तब्बल चार हजार कॉल रेकॉर्ड्स आढळले. ते तपासण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.सतीश मांगले, त्याची दुसरी पत्नी श्रद्धा व मेहुणा अतुल तावडे यांची पोलीस कोठडी संपल्याने बुधवारी खंडणीविरोधी पथकाने त्यांना न्यायालयात हजर केले. सापडलेल्या कॉल रेकॉडर््सची माहिती पोलिसांनी न्यायालयाला देऊन, त्याची पडताळणी करण्यासाठी पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली.राधेश्याम मोपलवार यांच्याकडून खंडणी उकळण्यासाठी सतीश मांगलेने त्यांचे कॉल्स रेकॉर्ड केले होते. मोपलवार यांच्यासोबत मोबाइल फोनवर बोलणारा आरोपी सतीश मांगलेच होता, हे सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी त्याच्या आवाजाचे नमुने घेतले आहेत. सतीशच्या आवाजाचे नमुने आणि कॉल रेकॉर्ड्समधील संभाषण पडताळून पाहण्यासाठी ते फोरेन्सिक लॅबकडे पाठवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.दोन आरोपींचा शोधखंडणी प्रकरणात सतीश मांगलेसोबत आणखी दोन आरोपी सहभागी असल्याची माहिती तपासामध्ये समोर आली आहे. त्यापैकी एका आरोपीची भूमिका मध्यस्थासारखी आहे. दुसºया आरोपीने त्याच्या पत्नीला घटस्फोट दिला आहे. तो या गुन्ह्यामध्ये सक्रिय सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे. खंडणीविरोधी पथकाकडून त्याचा शोध सुरू आहे.