शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

महापालिकेच्या टॉय ट्रेनच्या अपघातात मायलेक जखमी; मीरारोडमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2022 11:20 IST

अखेर महादेव हे पत्नी व मुलास मीरा रोडच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले.

मीरा रोड  : महापालिकेने भाड्याने दिलेल्या मीरा रोडच्या वर्धमान फॅन्टेसीमध्ये खेळातील ट्रेन वेगाने चालविल्याने डबा घसरून झालेल्या अपघातात आई व मुलगा जखमी झाल्याप्रकरणी मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मीरा गावात राहणाऱ्या स्वप्नाली परब या मुलगा प्रतीश (वय ५) व पती महादेव असे १३ मार्चला मीरा रोडच्या शिवार तलाव येथील वर्धमान फॅन्टेसी येथे विरंगुळ्यासाठी गेले होते. प्रतिशला लहान मुलांच्या ट्रेनमध्ये बसायचे असल्याने स्वप्नाली या त्याला घेऊन शेवटच्या डब्यात बसल्या. ट्रेनचालकाने ट्रेन ही नियमित वेगापेक्षा अधिक वेगाने निष्काळजीने चालवल्याने ट्रेनचा शेवटचा डबा रुळावरून घसरून तिरपा झाला. त्यामुळे त्या डब्यातील स्वप्नाली व प्रतिश हे दोघेही बाहेर फेकले गेले.

प्रतिश तर सुमारे पाचे ते सात फूट लांब जाऊन पडला. त्यामुळे त्याच्या डाव्या खांद्यास मार लागून फ्रॅक्चर झाला व उजव्या बाजूच्या गालावर खरचटले. तर स्वप्नाली यांच्या नाकाच्या खाली, ओठाला मार लागून रक्त आले. तसेच उजव्या पायालाही खरचटले. जखमी आई व मुलास उपचारासाठी पाठवण्याऐवजी ट्रेन चालकाने उलट अरेरावी करत त्यांच्याशीच हुज्जत घातली. 

‘व्यवस्थापकावरही कारवाई करा’अखेर महादेव हे पत्नी व मुलास मीरा रोडच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले. याप्रकरणी सोमवारी मीरा रोड पोलीस ठाण्यात ट्रेन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तर वर्धमान फॅन्टेसीच्या व्यवस्थापकावरही कारवाईची मागणी होत आहे.

टॅग्स :mira roadमीरा रोड