शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वाडा तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 23:07 IST

बाधितांचे स्थलांतर करण्याचे आश्वासन; पाली आश्रमशाळा तत्काळ सुरू करण्याचे आदेश

वाडा : रविवारी (४ आॅगस्ट) वाडा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र हाहा:कार उडून जवळपास ६० गावांना याचा फटका बसला आहे. यात बोरांडा गाव आणि पाली येथील शासकीय आश्रमशाळा येथे जास्त नुकसान झालेल्या भागांना खा. राजेंद्र गावित यांनी गुरुवारी भेट दिली. या बाधित भागांची पहाणी करून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.अतिवृष्टीमुळे बोरांडा गावातील जवळपास १०४ कुटुंबे बाधित झाली आहेत. या प्रत्येक बाधित कुटुंबाना तात्काळ मदत म्हणून ५ हजार रुपयांची भांडी, कपड्यांसाठीची मदत आणि १० किलो तांदूळ, १०किलो गहू तसेच ५ ली. रॉकेल अशी प्राथमिक स्वरुपाची मदत प्रशासनाच्यावतीने खा. गावितांच्या हस्ते देण्यात आली. अतिवृष्टीच्यावेळी आपल्या जीवाची बाजी लावून तराप्याच्या साहाय्याने १७ नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहचिवणारे पप्या पवार व कल्पेश गवते या तरु णांना खासदार गावितांनी प्रत्येकी ११ हजार रु पये बक्षीस म्हणून देवून त्यांचा गौरव केला.बोरांडा गावातील पूर परिस्थितीची पहाणी केल्यानंतर या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून सर्व आदिवासी बाधित कुटुंबांशी चर्चा करून अन्यत्र स्थलांतर करण्याचा निर्णय यावेळी सर्वानुमते घेण्यात येऊन या निर्णयाला येथील आदिवासींनी दुजोरा दिल्याने स्थलांतरीत करण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश गावितांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.त्यानंतर खासदारांनी पाली आश्रम शाळेची पाहणी केली. येथे कायम पाण्याची पातळी वाढून आश्रमशाळेत सुमारे सात ते आठ फुट उंचीपर्यंत पाणी वाढते. येथील विद्यार्थ्यांना अन्यत्र स्थलांतरित करण्यात येते. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने या आश्रमशाळेसाठी बांधण्यात आलेल्या नवीन इमारतीमध्ये या विद्यार्थ्यांना तत्काळ तिथे स्थलांतरीत करून त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे. या संदर्भात आश्रमशाळा प्रशासनाबरोबर संपर्क साधून पुढील कार्यवाही संदर्भात खासदार गावितांनी आदेश दिले.या दौºयादरम्यान उपविभागीय अधिकारी अर्चना कदम, नायब तहसीलदार मिताली परदेशी, सहाय्यक गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते, शिवसेनेचे जिल्हा सहसमन्वयक गोविंद पाटील, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार पाटील, वाड्याच्या नगराध्यक्षा गीतांजली कोलेकर, पंचायत समिती सदस्य नरेश काळे, उपतालुका प्रमुख तुषार यादव, शहर प्रमुख नरेश चौधरी यांसह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :floodपूर