ठाणे : कॉपी तपासण्याच्या नावाखाली विद्यार्थिनीस इमारतीच्या गच्चीवर नेऊन तिचा विनयभंग केल्याची घटना ठाण्यात घडली.ठाण्यातील सरस्वती मराठी विद्यालयात शिकणारी १० वर्षांची विद्यार्थिनी सोमवारी दुपारी घरी जात असताना बी केबिन परिसरात अंदाजे २८ वर्षीय अनोळखी युवकाने तिला अडवले. तुम्ही मुले कॉपी करता. त्यामुळे परीक्षेला बसता येणार नाही, असे धमकावून दफ्तर तपासण्यासाठी त्याने मुलीला रेखा व्हिला इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर नेले. तिथे कॉपी तपासण्याच्या नावाखाली तिचा विनयभंग केला. या प्रकरणी नौपाडा पोलिसांत मुलीच्या आईने तक्रार दाखल केली आहे. (प्रतिनिधी)
कॉपी तपासण्याच्या नावाखाली विनयभंग
By admin | Updated: March 30, 2017 04:09 IST