शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक अत्याचाराच्या सुनावणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा कोर्टाबाहेर विनयभंग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 20:10 IST

वर्षभरापूर्वी झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या सुनावणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा त्याच आरोपीने कोर्टाबाहेर विनयभंग केल्याची घटना ठाण्यात उघडकीस आली.

ठाणे,  दि. 2 - वर्षभरापूर्वी झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या सुनावणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा त्याच आरोपीने कोर्टाबाहेर विनयभंग केल्याची घटना ठाण्यात उघडकीस आली.15 वर्षीय पीडित मुलगी ठाण्यातील मिरा रोडची रहिवासी आहे. वर्षभरापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला होता. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी ती 29 जुलै रोजी आई-वडिलांसोबत ठाणो जिल्हा व सत्र न्यायालयात आली होती. सुनावणी आटोपल्यानंतर दुपारी 12 वाजताच्या न्यायालयाच्या तीन नंबरच्या प्रवेशद्वाराजवळ आरोपीने तिचा विनयभंग केला. पुन्हा एकदा बलात्कार करण्याची धमकीही आरोपीने दिल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे. तिच्या तक्रारीवरून ठाणोनगर पोलिसांनी 31 जुलै रोजी याप्रकरणी आरोपी जगजितसिंग स्वर्णसिंग हिन्ना आणि त्याची पत्नी मंगला जगजितसिंग हिन्ना यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.या तक्रारीच्या प्राथमिक तपासात पोलिसांना वेगळीच माहिती मिळाली. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित मुलीच्या आईने आंतरधर्मिय विवाह केला होता. पिडित मुलीवर वडिलच लैंगिक अत्याचार करतात, अशी तक्रार तिच्या आईने गतवर्षी काशिमिरा पोलीस ठाण्यात दिली होती. याशिवाय जगजितसिंग स्वर्णसिंग हिन्ना आणि पिडित मुलीमध्येही प्रेमसंबंध होते. या संबंधांमध्ये तणाव निर्माण होऊन पिडित मुलीने त्याच्याविरोधातही लैंगिक अत्याचाराची तक्रार गतवर्षीच दिली होती. त्यानुसार नयानगर पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा आरोपीविरूद्ध दाखल करण्यात आला होता. या दोन्ही गुन्ह्यांची सुनावणी 29 जुलै रोजी ठाणो जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये होती. सुनावणी आटोपल्यानंतर न्यायालयाबाहेर फिर्यादी आणि आरोपीकडील पुरूषांमध्ये जुंपली. त्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी ठाणोनगर पोलीस ठाण्यात येऊन आरोपींनी विनयभंग केल्याची तक्रार दिली.पीडित मुलीच्या तक्रारीनुसार आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरु असल्याचे ठाणोनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक कुंभार यांनी सांगितले. आरोपींचे तीन पत्ते पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिले होते. मात्र त्या तिन्ही पत्त्यांवर आरोपींचा ठावठिकाणा नसल्याचे कुंभार यांनी सांगितले.