शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

नगरसेवक कार्यालयासमोर विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 04:26 IST

शिवसेनेचे नगरसेवक विकास रेपाळे यांच्या कार्यालयात दोन महिलांमध्ये वाद झाल्यानंतर सिद्धू अभंगेसह चौघांनी रेणुका जाधव हिला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार गुरुवारी घडला.

ठाणे : शिवसेनेचे नगरसेवक विकास रेपाळे यांच्या कार्यालयात दोन महिलांमध्ये वाद झाल्यानंतर सिद्धू अभंगेसह चौघांनी रेणुका जाधव हिला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार गुरुवारी घडला. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.एका १४ वर्षांच्या मुलाने कबुतराला हात लावला, त्यावरून ही महिला आणि अन्य एका महिलेमध्ये १७ मे रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास वाद झाला. हा वाद रेपाळे यांच्यापर्यंत गेला. त्यांच्याच कार्यालयात अभंगेसह चौघांनी तिला अश्लील शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर, विनयभंग करून गोळ्या झाडून मारण्याची आणि बलात्काराचीही धमकी दिल्याचे या महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या धमकीनंतरच रेपाळे यांची पत्नी नगरसेविका नम्रता जाधव यांनी अभंगे आणि अयज पासी यांना कार्यालयाच्या बाहेर काढले. त्यानंतर, ही तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्याकडे जात असतानाच अभंगे याने आपल्या मुलीचेही कपडे फाडून तिचाही विनयभंग केला. त्यावेळी तलवारीने घराच्या दरवाजाचे पत्रे कापले, असेही पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.हा प्रकार माझ्या कार्यालयात नव्हे, तर बाहेर घडला आहे. एका मुलाने कबुतराला हात लावण्यावरून दोन महिलांमध्ये वाद घडला. तिथे सिद्धू अभंगे नव्हता. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.- विकास रेपाळे, नगरसेवक, ठाणे