शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट गुरे, बेकायदा गोठ्यांना संरक्षण; महापालिकेकडे कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 00:54 IST

डुकरांविरोधात पालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे.

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेने मोकाट गुरांसह डुक्कर आदींवर कारवाईसाठी ठेका दिला आहे. प्रत्यक्षात मात्र ठेकेदार कारवाईच करत नाही. पालिकेचे अधिकारी व नगरसेवकही त्यावर मूग गिळून गप्प बसत आहेत. दुसरीकडे रस्ते, खाजगी, कांदळवन, सीआरझेडच्या जागेत सर्रास बेकायदा गोठे थाटण्यात आले आहेत. महापालिका आणि नगरसेवकांकडून त्यांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोप होत आहे.

मीरा-भार्इंदरमध्ये रस्त्यांवर खुलेआम फिरणारी मोकाट गुरे नागरिक, वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. दिवसरात्र रस्त्यांवर हिंडत असणाऱ्या गुरांमुळे वाहतूककोंडीही होत आहे. या समस्येत डुकरांचीही भर पडत आहे. डुकर पाळणाऱ्यांची संख्या वाढली असून सरकारी-खाजगी जागांसह कांदळवन भागात ही डकरे हैदोस घालत आहेत. त्यांच्यामुळे आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.महापालिकेच्या रस्ते-पदपथावरही बेकायदा गोठे थाटले आहेत. तेथेच गवतविक्रीचा धंदाही केला जात आहे. गवत, शेण व मूत्राने दुर्गंधी पसरत असून गटारेही तुंबत आहेत.

महापालिकेचे उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, पशुविभागाचे डॉ. विक्रम निराटले यांच्यासह संबंधित ठेकेदार यांच्याकडून शहरातील मोकाट जनावरे, तबेले यांच्यावर ठोस कारवाईऐवजी जबाबदारी झटकण्याचे काम सुरू आहे. अनेक नगरसेवकांचेही यात हितसंबंध गुंतल्याने तेही याबाबत ब्र काढत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. नगरसेवकांचे यात हितसंबंध नाहीत. माझ्या प्रभागातील रस्ता-पदपथावर असलेल्या गोठ्यांविरोधात तक्रारी केलेल्या आहेत, असे नगरसेवक पंकज पांडे यांनी सांगितले. आपण पुन्हा याचा पाठपुरावा करून कारवाई करायला पालिकेस सांगितले आहे. पालिका कारवाई त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे ते म्हणाले.गोठ्यांवर कारवाई सुरूमहापालिका उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे म्हणाले की, कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न नाही. डुकरांविरोधात पालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. मोकाट गुरे, रस्ते-पदपथावरील व्यवसाय-गोठे व शहरातील कांदळवन, सीआरझेड, नाविकास क्षेत्र तसेच अन्य खाजगी-सरकारी जागेतील बेकायदा गोठ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देऊन कारवाईचा आढावा घेण्यात येईल, असे सांगितले.