शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मोगरा ३०० वरून ६० रुपये किलो; शेतकरी रडकुंडीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 01:25 IST

लॉकडाऊनचा फटका; सात महिन्यांपासून भाव पडलेलेच

- राहुल वाडेकर विक्रमगड : तालुक्यातून दररोज अंदाजे १२-१३ टन मोगऱ्याच्या कळ्या दादर, कल्याण, सुरत, नाशिक, पालघर मार्केटमध्ये निर्यात होत असतात. मोगºयाच्या शेतीतून वर्षाकाठी लाखोंची उलाढाल होते. मात्र, कोरोनामुळे सहा महिन्यांच्या लॉकडाऊ नकाळात फुलशेतीला मोठा फटका बसला आहे. ३०० रुपये किलोने विकला जाणारा मोगरा ६० रुपये किलोने द्यावा लागत आहे. त्यातील मोगरा काढणाºया मजुरांना ४० रुपये मजुरी द्यावी लागते. त्यामुळे मोगरा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.खांड, वाकडूपाडा, ओंदे, साखरा, सुकसाले, कुरंझे, उघाणी, उपराले, देहरजा उंबरवांगण, साखरे, पोचाडा, वाकी, कावळा अशा अनेक गावांत शेकडो आदिवासी व इतर शेतकºयांनी मोगरा लावला आहे. मोगºयाचे दररोज साधारण पाच ते १५ किलो उत्पन्न अनेकांना मिळते. त्याला प्रतिकिलो ३०० ते ५०० इतका दर मिळत होता; मात्र मार्चपासून ते आतापर्यंत सात महिन्यांपासून मोगºयाला फारशी मागणी नसल्याने मोगºयाचे भाव पडलेलेच आहेत.मंदिरे, बाजारपेठा, लग्नसराई संचारबंदीत सापडल्याने फुलशेतीवर कुºहाड कोसळली. ऐन हंगामात मोगºयाची मागणी ठप्प झाल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. श्रावण महिना आणि गणपतीमध्ये तरी भाव वाढेल, अशी अपेक्षा शेतकºयांना होती; मात्र ही आशाही फोल ठरली.आता नवरात्र आणि दिवाळीत तरी भाव वाढतील, याकडे शेतकºयांचे डोळे लागले आहेत.यावर्षी कोरोना संसर्गामुळे मंदिरे, बाजारपेठा, लग्नसराई, संचारबंदीत ऐन सराई निघून गेल्याने मोगरा विकता आला नाही. आता व्यापारी केवळ ६० रुपये किलोने मोगºयाला भाव देत आहेत, तर मजुरांना कळ्या काढण्यासाठी आम्हाला ४० रुपये द्यावे लागत आहेत.- हरी तारवी, मोगरा उत्पादक शेतकरीसध्या मोगºयाला बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चही निघेनासा झाला आहे. आगामी नवरात्र व दिवाळीत तरी बाजारभावात वाढ होईल.- शिवम मेहतामोगरा उत्पादक शेतकरी