शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

सीईटीपीचे आधुनिकीकरण निविदा प्रक्रियेच्या फेऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 23:16 IST

खर्च ६१ कोटींनी वाढला : एमआयडीसीकडून वेळकाढूपणा

मुरलीधर भवार

कल्याण : डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यांतून सोडण्यात येणाºया रासायनिक सांडपाण्यावर निकषांच्या आधारे प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे (सीईटीपी) आधुनिकीकरण करावे, असे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने २०१७ मध्ये दिले होते. मात्र, सीईटीपीच्या आधुनिकीकरणाचा विषय निविदेच्या फेºयात अडकला आहे. एमआयडीसीकडून याविषयी निर्णय घेण्यात चालढकल केली जात आहे. त्यामुळे आधुनिकीकरणाचा खर्च १०० कोटींवरून १६१ कोटींवर पोहोचला असून, वाढीव खर्च कसा व कोणी करायचा, असा पेच निर्माण झाला आहे. परिणामी, प्रदूषणाचा प्रश्न कायम आहे.

डोंबिवली एमआयडीसीत रासायनिक प्रक्रिया, कापड उद्योग प्रक्रिया, इंजिनीअरिंग, औषध उत्पादन करणारे, असे जवळपास ४३२ कारखाने आहेत. औद्योगिक वसाहतीतील फेज-१ मध्ये १५ दशलक्ष लीटर क्षमतेचे तर, फेज-२ मध्ये १.५ दशलक्ष लीटर क्षमतेचे रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहे. फेज-२ मध्ये रासायनिक कारखान्यांतून बाहेर पडणाºया सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. ही दोन्ही प्रक्रिया केंद्रे कारखानदारांच्या पैशांतून चालविली जात असून, त्यासाठी दोन्ही ठिकाणी संचालक मंडळ आहे.रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमध्ये निकषांनुसार प्रक्रिया केली जात नसल्याने प्रदूषण होत आहे, असा दावा वनशक्ती या पर्यावरण संस्थेने केला आहे. याप्रकरणी २०१३ पासून हरित लवादाकडे याचिका न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे या केंद्रांचे आधुनिकीकरण करावे, असे आदेश लवादाने २०१७ मध्ये दिले होते. त्यानुसार, फेज-२ मधील केंद्राच्या आधुनिकीकरणाचा आराखडा लवादाकडे सादर करण्यात आला होता. लवादाने त्याला मान्यता दिली होती. मात्र, एमआयडीसीकडून कारखानदारांना सोयीसुविधा पुरविल्या गेल्या पाहिजेत. त्यामुळे एमआयडीसीने फेज-१ मधील केंद्राच्या आधुनिकीकरणासाठी ८२ कोटी व फेज-२ चे केंद्रांसाठी १८ कोटी असे एकूण १०० कोटी रुपये खर्च करण्याची तयारी दर्शविली होती.

एका अमेरिकी कंपनीद्वारे आधुनिकीकरणाचे काम केले जाणार होते. १०० कोटींच्या खर्चात २५ टक्के रकमेचा सहभाग कारखानदारांनी करायचा होता. त्यानुसार, २५ कोटी रुपये भरण्यास कारखानदारांनी तयारी दर्शविली होती. मात्र, निविदा प्रक्रिया राबवण्यात एमआयडीसीकडून विलंब होत गेला. आता फेज-१ च्या केंद्रासाठी ८२ कोटींऐवजी १४० कोटींच्या खर्चाची, तर फेज-२ साठीच्या केंद्रासाठी १८ कोटींऐवजी २१ कोटींची निविदा काढली जाईल, असे सांगण्यात येत आहे. दोन्ही केंद्रांसाठी १६१ कोटी रुपये खर्च येणार आहे. १०० कोटींवरून हा खर्च ६१ कोटींनी वाढला आहे. त्यामुळे कारखानदारांच्या सहभागाच्या रकमेतही वाढ होणार आहे.फेज-१ च्या केंद्राच्या आधुनिकीकरणासाठी ५८ कोटी रुपयांची वाढ कशी काय झाली, असा प्रश्न आहे. त्यामुळे फेज-१ च्या केंद्राचे आधुनिकीकरण कारखानदारांनीच करावे, या निर्णयाप्रत एमआयडीसी आली आहे. फेज-२ च्या केंद्राच्या आधुनिकीकरणाचा आराखडा कारखानदारांनी लवादास दिला होता. तो पाच कोटी ८५ लाख रुपये खर्चाचा होता. एमआयडीसीने त्याचा खर्च सुरुवातीला १८ कोटी दाखविला. त्यानंतर त्यात वाढ करून तो २१ कोटी केला. त्यामुळे फेज-२ चे कामही करण्याची तयारी कारखानदारांनी दर्शविली आहे. यासंदर्भात एमआयडीच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे निविदा प्रक्रिया व वाढलेली रक्कम या सगळ्या विवादात ठोस निर्णय घेऊन केंद्रांचे आधुनिकीकरण करण्याची गरज आहे.आदेशाचे उल्लंघनएमआयडीसीने वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारल्याने एक प्रकारे प्रदूषण दूर करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याऐवजी हे सगळे प्रकरण कागदी घोडे नाचविण्यापुरतेच मर्यादित राहिले आहे.लवादाने सहा महिन्यांत आधुनिकीकरण करण्याच्या दिलेल्या आदेशाचे एमआयडीसीकडूनच उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे, असा आरोप कामाचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी केला आहे.

टॅग्स :thaneठाणेkalyanकल्याण