कल्याण : घराच्या उघड्या दरवाज्यावाटे प्रवेश करू न चार्जिंगला लावलेले मोबाइल चोरणाऱ्या चोरट्यास कल्याण पूर्वेत रंगेहात पकडण्यात आले. गोकुळ मोरे (२९, रा. औरंगाबाद) असे या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी घेलाराम मेघवाला यांच्या फिर्यादीवरू न कोळसेवाडी पालीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास सुरू आहे.दरम्यान शहरातील वाढत्या मोबाइल चोरीच्या घटनांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. (प्रतिनिधी)
मोबाइल चोरास कल्याणमध्ये अटक
By admin | Updated: December 22, 2016 05:40 IST