शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचे हायटेक निवडणूक कार्यालय आयोगाच्या रडारवर

By admin | Updated: January 31, 2017 03:27 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाण्यातील घंटाळी भागात निवडणुकीसाठी विशेष हायटेक कार्यालय शनिवारी पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते सुरू केले. परंतु, आता हे हायटेक कार्यालय

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाण्यातील घंटाळी भागात निवडणुकीसाठी विशेष हायटेक कार्यालय शनिवारी पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते सुरू केले. परंतु, आता हे हायटेक कार्यालय आयोगाच्या रडारवर आले आहे. ते सुरू करताना परवानगी घेतली नसल्याची माहिती समोर आली असून याविरोधात आता निवडणूक विभागाने स्थानिक पोलीस ठाण्याला पत्र दिले आहे. मनसेप्रमाणे इतर पक्षांनी शहरामध्ये निवडणूक विभागाची परवानगी न घेता किती कार्यालये उघडली आहेत, याची माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. अशा प्रकारे परवानगी न घेता कार्यालये सुरू करणाऱ्यांवर स्थानिक पोलीस ठाण्याच्या माध्यमातून गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.ठाण्यात सर्वच राजकीय पक्षांनी आपली निवडणूक कार्यालये ठिकठिकाणी थाटली असून यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हायटेक कार्यालयाचा समावेश आहे. शनिवारी मोठ्या थाटामाटात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. एवढ्या मोठ्या स्वरूपात उद्घाटनाचा कार्यक्र म आयोजित केला असतानाही स्थानिक नेत्यांनी ते करताना तसेच हे कार्यालय सुरू करताना निवडणूक विभागाची परवानगी घेण्याची तसदी घेतली नसल्याने हा सर्व प्रकार आता मनसेच्या स्थानिक नेत्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकारानंतर आता निवडणूक विभागाने या सर्व प्रकारची दखल घेऊन स्थानिक पोलीस ठाण्याला सर्व अहवाल दिला असून आता त्यांच्या माध्यमातून आयोजकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. निवडणूक विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष त्यात्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ््या राजकीय पक्षांच्या कार्यलयाची माहिती घेण्याचे काम करत असून लवकरच सर्व निवडणूक कार्यालयांची माहिती उपलब्ध होणार असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)