शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दुकानदारांना मनसेचा दोन दिवसांचा अल्टिमेटम; दोन दिवसांत पाट्या न लावल्यास मनसे स्टाईलने पुन्हा आंदोलन करणार

By अजित मांडके | Updated: December 4, 2023 20:19 IST

ठाण्यात मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांच्या विरोधात काही दिवसांपूर्वी मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते.

ठाणे : ठाण्यात मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांच्या विरोधात काही दिवसांपूर्वी मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही ठाण्यातील दुकानदारांनी म्हणावा तसा प्रतिसाद दिलेला नाही. विशेष करून ग्ल्याडी अल्वारीस रोड, पोखरण रोड दोन या भागातील दुकानदारांनी अद्याप मराठीत पाट्या न लावल्याने मनसेचे जनहित व विधी विभागाचे शहराध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी दोन दिवसांत मराठी पाट्या न लावल्यास पुन्हा मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे.

शहरातील दुकानांवर मराठी पाट्या करण्यासंदर्भात न्यायालयाने मुदत देऊनही बाजारपेठांमध्ये अजूनही इंग्रजी पाट्या झळकत असल्यामुळे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले होते. मात्र हे आंदोलन होऊनही ठाण्यातील काही ठिकाणी तसेच  ग्ल्याडी अल्वारीस रोड, पोखरण रोड दोन या भागातील दुकानदारांनी अद्याप मराठीत पाट्या न लावल्याने स्वप्नील महिन्द्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग अध्यक्ष मनीष सावंत, देवेंद्र कदम, हिरा पासी यांनी नियमांना हरताळ फासणाऱ्या दुकान मालकांना तात्काळ याप्रश्नी न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत निवेदन दिले आहे. येत्या दोन दिवसांत याठिकाणी मराठी पाट्या न दिसल्यास मनसे स्टाईल दणका दिला जाईल, असा इशारा मनसेच्या या पदाधिकाऱ्यांनी दिला.  

मराठी पाट्यांच्या तपासणीसाठी  १२ दुकान निरीक्षकांवर जबाबदारी

दुकानांवर मराठीत ठळक अक्षरात पाट्या लावण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार दुकाने, हॉटेल, आस्थापनांच्या मराठी पाट्यांच्या तपासणीची जबाबदारी १२ दुकान निरीक्षकांना कामगार विभागाकडून देण्यात आली आहे. १ डिसेंबरपासून ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून ३१ डिसेंबरपर्यंत या मोहिमेनुसार जिल्ह्यातील दुकानांची तपासणी केली जाणार आहे. या मोहिमेत नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानांना नोटिसा बजावल्या जाणार आहेत.राज्य सरकारने दुकाने आणि आस्थापना अधिनियम २०१७ अंतर्गत मराठी देवनागरी लिपीचा फॉन्ट लहान असू नये, अशी नियमावली जाहीर केलेली असताना ठाण्यातील अनेक दुकानांमध्ये अद्यापही मराठी पाट्यांची वानवा आहे.