शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचे उद्या ‘चले जाव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 03:35 IST

शिवसेना-भाजपाने केडीएमसीत २२ वर्षे सत्ता उपभोगूनही करदात्या नागरिकांना हालअपेष्टा भोगाव्या लागत आहेत.

कल्याण : शिवसेना-भाजपाने केडीएमसीत २२ वर्षे सत्ता उपभोगूनही करदात्या नागरिकांना हालअपेष्टा भोगाव्या लागत आहेत. त्यात आता त्यांचे बळीही जाऊ लागले आहेत. अशा निष्क्रिय ठरलेल्या सत्ताधाऱ्यांनी सत्तेतून पायउतार व्हावे, या मागणीसाठी मनसेतर्फे मंगळवारी सकाळी १०.३० वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीपासून केडीएमसी मुख्यालयावर ‘चले जाव’ मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार प्रकाश भोईर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.कल्याणमध्ये खड्ड्यांमुळे चौघांचा बळी गेला आहे. याप्रकरणी मनसेने सत्ताधारी शिवसेना-भाजपा आणि महापालिकेला जबाबदार धरले आहे. शिवाजी चौकातील रस्त्यावर दोन बळी गेले आहेत. सार्वजनिक बांधकाममंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत एमएसआरडीसीचा विभाग येत असताना त्यांना रस्त्यावर उतरून केडीएमसीच्या अधिकाºयांवर आगपाखड करायला लागते, हा प्रकार म्हणजे त्यांचे सत्ताधारी निष्क्रिय ठरल्याचे सिद्ध होते, असा आरोप मनसेने यावेळी केला.नागरिकांच्या हालअपेष्टांची जाणीव नसलेल्या तसेच बेफिकीर प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर काडीमात्र अंकुश नसणाºया सत्ताधाºयांविरोधात मंगळवारच्या आंदोलनातून ‘चले जाव’चा नारा आळवला जाणार असल्याचे भोईर यांनी सांगितले.>प्रकल्प अर्धवट स्थितीतगोविंदवाडी बायपास, दुर्गाडी पूल, ठाकुर्ली पूल, समांतर रस्ता, माणकोली पूल, मोहने उड्डाणपूल, आधारवाडी-गांधारी काँक्रिटीकरण रस्ता आदी प्रकल्प अर्धवट स्थितीत असल्याने कोंडी, अपघाताचे चित्र कायम आहे, असा आरोपही पदाधिकाºयांनी केला. एकही प्रकल्प मुदतीत पूर्ण झालेला नाही.