शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
6
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
7
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
8
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
9
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
10
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
11
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
12
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
13
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
14
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
15
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
16
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
17
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
18
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
19
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
20
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...

मनसे पदाधिकाऱ्यांच्या नाशिक सहली सुरू

By admin | Updated: January 10, 2017 06:35 IST

‘भाजपा म्हणजे थापा’ अशी घोषणा देत आणि सत्ताधारी शिवसेनेविरूद्ध रान उठवत

ठाणे : ‘भाजपा म्हणजे थापा’ अशी घोषणा देत आणि सत्ताधारी शिवसेनेविरूद्ध रान उठवत, नाशिकच्या कामांचे प्रेझेंटेशन दाखवत कल्याण-डोंबिवलीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदारांना घातलेली साद अपयशी ठरल्यानंतरही ठाण्यात पुन्हा नाशिकची आंबट द्राक्षे गोड करून घेण्याचा प्रयोग होणार आहे. तेथील विकासकामे सांगत ठाणेकरांपुढे मतांचा जोगवा मागण्याचे मनसेने ठरवले आहे. त्यासाठी रविवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नाशिक सहली सुरू झाल्या आहेत.गेल्या निवडणुकीत ठाण्यात मनसेकडे सात जागा होत्या. त्यातील काही पक्षाच्या इंजिनातून पायउतार झाले. पण या नगरसेवकांनी केलेल्या कामांच्या आधारावर पक्षाला मते मागणे शक्य नाही, हे आधीच लक्षात आल्याने पुन्हा नाशिक पॅटर्न वापरण्याचा निर्णय पक्षाने घेतला. त्यासाठी रविवारी ठाण्यातील मनसेच्या इच्छुकांना आणि पदाधिकाऱ्यांना मनसेने नाशिकच्या विकासकामांची सहल घडवली. शिवसेना-भाजपा या सत्ताधारी पक्षांत लोकार्पण आणि श्रेयाची लढाई सुरू आहे. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने आंदोलने करून सत्ताधाऱ्यांविरोधात वातावरण तापवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्यामुळे मनसेनेही आपली धुगधुगी कायम ठेवत दिव्यावर सर्वाधिक लक्ष केंद्रीत केले आहे. तेथील डम्प्ािंगविरोधात पक्षाने आंदोलन केले खरे, पण ते त्यांच्यावरच उलटले. दिव्यात वातावरण निर्मितीसाठी दिवा महोत्सव साजरा झाला. नाशिकप्रमाणे ठाण्याचा विकास करण्यासाठी शहर मनसेने इच्छुक आणि पदाधिकाऱ्यांसाठी नाशिक दौरा काढला. त्याला २८ बस आणि ४० चारचाकी गाड्यांचा ताफा नेण्यात आला. त्यात तब्बल १८०० हून अधिक पदाधिकारी सहभागी झाले. दिवसभर त्यांना नाशिकमधील विविध कामांची माहिती करुन देण्यात आली. त्यामध्ये बॉटनिकल गार्डन, कारंजे, चिल्ड्रन पार्क, सुशोभित चौक, विकसित रस्ते दाखवण्यात आले. ती कामे कशी केली हे सांगत ठाण्यातही असेच करू हे मतदारांना सांगायचे असे बिंबवण्यात आले. याच जोरावर आता ठाण्यातही मते मागितली जाणार आहेत. (प्रतिनिधी)