शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

लुटमार करणाऱ्या तृतीयपंथींना मनसेने चोपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 01:45 IST

शरीरविक्रयाचे आमिष दाखवून महामार्गावरील वाहनचालकांची लूट करणाºया तृतीयपंथींना रविवारी मध्यरात्री चोप देणारे मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, शहराध्यक्ष रवी मोरे यांच्यासह १५ ते २० जणांविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठाणे : शरीरविक्रयाचे आमिष दाखवून महामार्गावरील वाहनचालकांची लूट करणाºया तृतीयपंथींना रविवारी मध्यरात्री चोप देणारे मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, शहराध्यक्ष रवी मोरे यांच्यासह १५ ते २० जणांविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या हल्ल्यात तिघे तृतीयपंथी जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.भिवंडीतून ठाण्याकडे येणाºया नाशिक-ठाणे राष्टÑीय महामार्गाच्या कडेला उड्डाणपुलाच्या सुरुवातीला पाइपलाइनजवळील झुडुपात हे तृतीयपंथी अनैतिक व्यवसाय करतात. अनेकदा शरीरविक्रयाचे आमिष दाखवून ते या मार्गावरून जाणाºया ट्रकचालकांना लुटतात.मनसेने यापूर्वीही या तृतीयपंथींच्या कारवाया थांबवण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, यात काहीच फरक न पडल्याने अखेर रविवारी रात्री जिल्हाध्यक्ष जाधव, शहराध्यक्ष मोरे यांच्यासह पाच ते सहा महिला कार्यकर्त्यांनीही अचानक आक्रमक पवित्रा घेऊन हे आंदोलन केले. झुडुपात मिळालेल्या या तीन तृतीयपंथींना घेराव घालून महिला कार्यकर्त्यांनीही चांगलाच चोप दिला. अचानक झालेल्या या हल्ल्यात तिघे तृतीयपंथी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.दरम्यान, याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात सुमारे २० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, कोणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.२०१६ मध्ये कापूरबावडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बन्सी बारावकर यांच्या पथकाने याठिकाणी कारवाईसाठी पोलिसांचे पथक पाठवले होते. मात्र, १० ते १२ तृतीयपंथींच्या टोळक्याने पोलिसांवरच हल्ला केला होता. त्यातील काहींनी विवस्त्र होऊन पोलिसांसमोर बाका प्रसंग निर्माण केला होता.