शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

घर बांधण्यासाठी आता एमएमआरडीएची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 00:23 IST

जि.प.सीईओ : ग्रामपंचायतींना अधिकार नाही

ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बांधकाम परवानगीसाठी याआधी ग्रामपंचायतीचा नाहरकत दाखला लागत असे. मात्र, आता ग्रा.पं.च्या या दाखल्यास बंदी घालण्यात आली आहे. संबंधित बांधकामासाठी एमएमआरडीए किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घेण्याचे आदेश ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विवेक भीमनवार यांनी ग्रा.पं.ला दिले. यामुळे जिल्ह्यातील ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

एमएमआरडीए क्षेत्रात असलेल्या ग्रामपंचायतींमधील ग्रामस्थांना घर बांधायचे असल्यास त्यांना आता एमएमआरडीएची परवानगी घ्यावी लागणार आहे. तर, एमएमआरडीए क्षेत्राबाहेरील ग्रा.पं. असल्यास बांधकामासाठी जिल्हाधिकाºयांची परवानगी घ्यावी लागणार आहे. ग्रामपंचायतीच्या दाखल्यांवर न्यायालयाने हरकत घेतली आहे. यास अनुसरून ग्रा.पं.चे नाहरकत दाखले बंद केल्याचे सूतोवाच सीईओ यांनी केले. यावर मात्र जिल्हा परिषद सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून ग्रा.पं.कडे नाहरकत दाखल्याचे अधिकार ठेवण्याची मागणी लावून धरली आहे.

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय चर्चेला आला असता त्यावरील चर्चेत बहुतांशी सदस्यांनी सहभाग घेऊन नाराजी व्यक्त केली. भिवंडी, शहापूर आदी तालुक्यांसह अन्यही ठिकाणच्या सदस्यांनी बांधकामास नाहरकत दाखला देण्याचा ग्रा.पं.चा अधिकार कायम ठेवण्याची मागणी लावून धरली. गावातील गरिबाला घर बांधायचे झाल्यास तो सहज बांधत असे. पण, आता बांधता येणार नाही.सदस्यांनी व्यक्त केली खंतबांधकाम करण्यात येणारी जागा गावठाणाची असेल, तर संबंधित ग्रा.पं.ला नाहरकत दाखल देता येईल. पण, त्यासाठीदेखील ग्रामसभेची परवानगी लागेल. तरच तो येईल. कायद्यातील तरतुदीस अनुसरून ग्रा.पं.ना आदेश दिले असल्याचे सीईओ यांनी सभागृहात नमूद केले. ग्रामपंचायतींच्या अधिकारावर गदा आणली जात असल्याचा आरोपही यावेळी काही सदस्यांनी केला. यामुळे आता ग्रामस्थांना, गोरगरिबांना सहजासहजी घर बांधता येणार नसल्याची खंत सदस्यांनी व्यक्त करून ग्रामपंचायतींचे अधिकार कायम ठेवण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.