शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आमदार गायकवाड व महेश गायकवाड वाद पेटणार; द्वारली येथील वादग्रस्त जमीन मोजणीवरून राडा

By सदानंद नाईक | Updated: September 2, 2024 20:08 IST

संशयित इसमाकडून गावठी कट्टा, कोयता, चॉपर आदी घातक शस्त्र दिली शेतकऱ्यांनी पकडून, हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

सदानंद नाईक, उल्हासनगर : द्वारलीगावातील सर्वे नं-६ ज्या वादग्रस्त जमिनीच्या मोजणीवेळी शेतकरी व विकासकांच्या समर्थकात सोमवारी दुपारी १ वाजता राडा झाला. यावेळी शेतकऱ्यांनी पकडलेल्या संशयित इसमाकडून गावठी कट्टा, कोयता, चॉपर, आदी घातक शस्त्र पकडून हिललाईन पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी दिली. याच वादग्रस्त जमिनीच्या वादातून आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यात यापूर्वी गोळीबार झाल्याचे बोलले जाते. 

शहराच्या हिललाईन पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या कॅबिन मध्ये शिंदेंसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख महेश गायकवाड यांच्यासह अन्य जनावर गोळीबार केल्याने राज्यात खळबळ उडून कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले होते. महेश गायकवाड रुग्णालयातून उपचार करून सुखरूप बाहेर आले असून आमदार गणपत गायकवाड जेलची हवा खात आहेत. मात्र द्वारली गावातील वादग्रस्त जमिनीचा वाद पुन्हा उफाळून आला. सोमवारी दुपारी १ वाजता द्वारली गावातील वादग्रस्त जमीनची मोजणी करण्यासाठी भूमापन विभागाचे अधिकारी व कर्मचारी गेले होते. यावेळी विकासक व त्यांचे समर्थक मंडळी उपस्थित होते. 

जमीन मोजणीला स्थानिक शेतकऱ्यांनी आक्षेप घेऊन प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगितले. याबाबत शेतकऱ्यांनी महेश गायकवाड यांना माहिती दिल्यावर ते समर्थकासह घटनास्थळी धावून आले. शेतजमीन मोजणी वेळी शेतकरी व विकासकांच्या समर्थकात तू तू मैं झाल्यावर, शेतकऱ्यांनी संशयित इसमाच्या बैग तपासल्या असत्या, त्यामध्ये गावठी कट्टा, कोयता, चॉपर आदी घातक शस्त्र मिळाली. यादरम्यान हिललाईन पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर शस्त्रासह संशयित काही इसमाना ताब्यात घेऊन हिललाईन पोलीस ठाण्यात घेऊन आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून शस्त्र व काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी दिली. याप्रकाराने पुन्हा आमदार गणपत गायकवाड व महेश गायकवाड यांच्यात ठिणगी पडण्याची भीती व्यक्त होत आहे.

 नोटिसा न देता मोजणी कधी...महेश गायकवाड

वादग्रस्त जमिनीची मोजणीची शेतकऱ्यांना नोटिसा न देता भूमापन अधिकारी जागेची मोजणी कशी करू शकतात?. तसेच मोजणी ठिकाणी शस्त्र घेऊन येणारे इसम कोण? आदींच्या चौकशीची मागणी महेश गायकवाड यांनी पोलिसांना केली. तसेंच फरार असलेला वैभव गायकवाड याच परिसरात फिरत असल्याचा आरोप केला.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर