शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

Bharat Bandh: भिवंडीत भारत बंदला समिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 16:53 IST

भिवंडीत काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना देखील या बंद मध्ये सहभागी झाली होती .

- नितिन पंडीत 

भिवंडी: केंद्र शासनाने पारित केलेल्या कृषी विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी मंगळवारी देशातील विविध शेतकरी संघटनांसह भाजप व मित्रपक्ष वगळता सर्वपक्षीय भारत बंद आंदोलन करण्यात आला . या भारत बंदला भिवंडीत संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र मंगळवारी शहरात पाहायला मिळाले . सुरुवातीला सकाळी मंगलबाजार , वंजारपट्टी नाका , जकात नाका , बस स्टॅण्ड , कोटर गेट अशा शहरातील मुख्य ठिकाणी बंद पाळण्यात आला होता मात्र दुपारी एक वाजे नंतर सर्वत्र दुकाने उघडलेली पाहायला मिळाली . त्यामुळे भिवंडीत या बंदला फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे पाहायला मिळाले . विशेष म्हणजे दुपारी शहरातील जवळपास सर्वच दुकाने उघडी दिसली तर प्रत्येक रिक्षा स्टँडवर रिक्षांसह वाहनांची वर्दळ दिसली . 

भिवंडीत काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना देखील या बंद मध्ये सहभागी झाली होती . केवळ भाजप व भाजप मित्र पक्षवगळता सर्वच राजकीय पक्षांनी याला बंदला साथ दिली असल्याने शहरात कडकडीत बंद पाळण्यात येईल अशी चर्चा होती मात्र तसे चित्र आज पाहायला मिळाले नाही . सकाळी काही काळ बंद असलेली दुकाने दुपारी उघडण्यात आल्याने या बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद दिसला. विशेष म्हणजे भारत बंद आंदोलनामुळे भिवंडीतील रस्त्यांवर शुकशुकाट दिसेल अशी अपेक्षा असतांनाही धामणकर नाका तसेच कल्याण नाका  व जकातनाका परिसरात चक्क वाहतूक कोंडी पाहायला मिळाली तर धामणकर नाका येथे रिक्षा चालकांची गर्दी व दुकाने उघडी दिसली. विशेष म्हणजे संमिश्र प्रतिसाद असला तरी शहरात सर्वत्र शांतात पाहायला मिळाली दरम्यान या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणेBharat Bandhभारत बंद