शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात झाडासाठी मिस्ट फॉगर मशीन ठरली वरदान; धुळीवर पाणी फवारणी व झाडांना पाणी

By सदानंद नाईक | Updated: March 17, 2025 16:12 IST

विकास कामामुळे शहरात निर्माण झालेल्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला.

सदानंद नाईक उल्हासनगर : विकास कामामुळे शहरात निर्माण झालेल्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. यावर उपाय म्हणून महापालिकेने धुळीवर पाणी फवारणीसाठी दोन मिस्ट फॉगर मशीन खरेदी केल्या असून मशीनकडून झाडांना पाणी व झाडे धुण्याचे काम केले जाते. फॉगर मशीन टू इन वनचे काम करीत असल्याने, हजारो झाडांना जीवदान मिळाल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली. 

उल्हासनगरात ४२३ कोटीची भुयारी गटार योजना, १०३ कोटीची पाणी वितरण योजना, एमएमआरडीए अंतर्गत १५० कोटीच्या निधीतून मुख्य ७ रस्त्याचे काम असी असंख्य विकास कामे सुरु आहे. या विकास कामामुळे शहरांत सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाली असून धुळीवर फवारणी मारण्यासाठी महापालिकेने दोन मिस्ट फॉगर मशीन खरेदी केल्या आहेत.या फॉगर मशीन रस्त्यावर पाणी फवारणी करण्याचे काम करीत होती. मात्र गेल्या काही महिन्यापासून मिस्ट फॉगर मशीनकडून रस्त्याच्या डिव्हायडर मधील झाडांना पाणी देणे. रस्त्या शेजारील व रस्ता डिव्हायडर मधील झाडे धुणे आदी कामेही मशीनकडून करून घेतली जात आहे. एकीकडे प्रचंड प्रमाणात असलेल्या धुळीवर फवारणी करण्या ऐवजी झाडांना पाणी देणे, झाडे धुण्याचे काम मशीनकडून केले जात असल्याने, पालिका कारभारावर टीका होत आहे. 

मशीनचे टू इन वनचे काम मिस्ट फॉगर मशीन शहरातील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी खरेदी केली. प्रत्यक्षात मशीनकडून रस्ता दिव्हायडर मधील झाडांना पाणी देणे व रस्ता लगतची झाडें धुणे असे टू इन वनचे काम करीत असल्याची प्रतिक्रिया परिवहन विभागाचे प्रमुख विनोद केणी यांनी दिली. 

हजारो झाडांना जीवदान महापालिकेने शहर हरित व स्वच्छ दिसण्यासाठी रस्त्या लगत व रस्ता डीव्हायडर मध्ये हजारो झाडाची लागवड पावसाळ्यात लाखो रुपये खर्चून केले. मात्र झाडांना वेळेत पाणी न मिळाल्याने हजारो झाडें पाण्या अभावी जळून गेली. अश्या झाडांना जीवदान देण्यासाठी मिस्ट फॉगर मशीनचा उपयोग केला जात आहे.

 झाडे जगाविण्याचे काम कोणाचे?महापालिकेने लाखो रुपये खर्जून हजारो झाडे शहरातील विविध ठिकाणी लावण्यात आली. झाडांना वेळीच पाणी दिला नसल्याने, पाण्या अभावी हजारो झाडे मरून गेली. याला जबाबदार कोण? असा प्रश्न मनसे कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप थोरात यांनी महापालिका आयुक्ताना करून कारवाईची मागणी केली.