शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातून बेपत्ता मुलगा नवी दिल्लीमध्ये सापडला

By जितेंद्र कालेकर | Updated: September 2, 2024 22:42 IST

ठाणे नगर पाेलिसांनी घेतला शाेध : अभ्यासाच्या तणावातून साेडले घर

जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : अभ्यासाच्या तणावातून काॅलेजला दांडी मारणाऱ्या १६ वर्षांच्या मुलाला वडिलांनी जाब विचारल्यानंतर त्याने ठाण्यातील आपले घर साेडले हाेते. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाणे नगर पाेलिसांनी त्याचा चार राज्यांमध्ये शाेध घेतल्यानंतर ताे नवी दिल्ली भागात आढळला. त्याला आता सुखरूप त्याच्या पालकांच्या स्वाधीन केल्याची माहिती ठाणेनगर पाेलिसांनी साेमवारी दिली.

ठाण्यातील एका नामांकित काॅलेजमध्ये शिकणारा प्रवीण शर्मा (नावात बदल) हा मुलगा गेल्या काही दिवसांपासून काॅलेजलाच गेला नसल्याची माहिती त्याच्या पालकांना मिळाली. याचाच जाब विचारल्यानंतर प्रवीण याने घरी येण्याऐवजी रेल्वेने थेट नवी दिल्ली गाठली. दरम्यान, त्याचा सर्वत्र शाेध घेऊनही ताे ठाणे शहर परिसरात न आढळल्याने याप्रकरणी त्याच्या अपहरणाची तक्रार १४ ऑगस्ट राेजी त्याच्या पालकांनी ठाणेनगर पाेलिस ठाण्यात दाखल केली. सहायक पोलिस निरीक्षक सपना ताटे-केचे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भारत मारकड, पोलिस हवालदार विक्रम शिंदे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचा शाेध घेतला असता, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, तसेच दिल्ली येथे त्याचे लाेकेशन मिळाले. त्याचा वेगवेगळ्या ठिकाणी शाेध घेतल्यानंतर त्याला २७ ऑगस्ट राेजी दिल्लीतून ताब्यात घेऊन त्याच्या पालकांच्या ताब्यात दिले.

या तपासामध्ये तांत्रिक माहिती मिळविण्यासाठी ठाणे सायबर सेल विभागातील वरिष्ठ पाेलिस निरीक्षक प्रकाश वारके यांच्यासह पाेलिस अंमलदार समाधान माळी, विजय खरटमल, प्रवीण इंगळे यांनी मदत केली. प्रवीण हा संगणक अभियात्रिकीच्या तिसऱ्या वर्षाला आहे. गेल्या वर्षी त्याला तीन विषयांमध्ये कमी गुण मिळाले. यातूनच ताे गेल्या काही दिवसांमध्ये अभ्यासाच्या तणावात हाेता. त्यामुळेच ताे काॅलेजमध्येही जात नव्हता. याचाच जाब विचारल्यानंतर त्याने घर साेडल्याचे पाेलिसांना सांगितले. त्याचे समुपदेशन केल्याचे सहायक पोलिस निरीक्षक सपना ताटे यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी