शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भाजप नगरसेविकेशी पदाधिकाऱ्याचे गैरवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 01:36 IST

पतीलाही धमकी; विनयभंगाचा गुन्हा दाखल

डोंबिवली : ठाकुर्ली परिसरातील भाजप नगरसेविकेशी गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली भाजपचे पदाधिकारी संजय चौधरी यांच्याविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. नगरसेविकेच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे.चौधरी हे भाजपचे ओबीसी सेलचे डोंबिवली शहर पूर्वचे अध्यक्ष तसेच पक्षाचे पूर्व विभागाचे उपाध्यक्षही आहेत. २९ सप्टेंबर रोजी ठाकुर्ली पूर्वेतील दत्ता पाटील चाळीजवळील हलाल चिकन सेंटरसमोर पाणीगळतीच्या दुरुस्तीचे काम महापालिकेच्या चार ते पाच कर्मचाऱ्यांच्या वतीने सुरू होते. काम व्यवस्थित होते की नाही, हे पाहण्यासाठी त्या कामाच्या ठिकाणी संबंधित नगरसेविका या पती आणि मुलासोबत उभ्या असताना चौधरी हे अंगाला अंग घासून तेथून गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच २ आॅक्टोबरला ठाकुर्लीतील गावदेवी मंदिराजवळ पाणीगळतीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना तेथे पुन्हा चौधरी आले. याबाबत त्यांना विचारणा केली असता नगरसेविका आणि त्यांच्यात वाद झाला, यात चौधरी यांनी पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडल्याचे रामनगर पोलीस ठाण्यात नगरसेविकेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, स्वत:च्याच पक्षातील नगरसेविकाचा विनयभंग केल्याचा आणि पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली भाजपच्या पदाधिकाºयावर गुन्हा दाखल झाल्याने पक्षामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.प्रतिमा मलीन करण्याचा प्रकारस्थानिक लोकप्रतिनिधीकडून कोणतीही कामे होत नसल्याने नागरिक सातत्याने नागरी समस्यांबाबत माझ्याशी संपर्क साधत आहेत. जनतेचा कौल माझ्याकडे वाढत असल्याने खोटे आरोप करून माझी प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रकार आहे. केडीएमसीची निवडणूक समोर ठेवून माझ्याविरोधात हे षड्यंत्र रचले गेले आहे. केवळ वाद झाला, त्याची मी तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे.- संजय चौधरी, भाजप डोंबिवली पूर्व उपाध्यक्ष