शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मीरारोडमध्ये ५२ जणांना कावीळ

By admin | Updated: August 30, 2015 23:22 IST

मीरारोडच्या सुंदरनगर गृहसंकुलातील २५५ कुटुंबाला गेल्या काही महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा होत असून त्यातील ५२ जणांना कावीळ झाल्याचे त्यातील रहिवाशांनी

भार्इंदर : मीरारोडच्या सुंदरनगर गृहसंकुलातील २५५ कुटुंबाला गेल्या काही महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा होत असून त्यातील ५२ जणांना कावीळ झाल्याचे त्यातील रहिवाशांनी सांगिले. मात्र, दूषित पाण्याचा शोध घेण्याऐवजी पालिकेने रहिवाशांनाच नोटीसा पाठवून नवीन जलवाहिन्या टाकण्याचा अजब सल्ला दिला आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराज मुख्य मार्गावर २५० हुन अधिक कुटुंबांचे वास्तव्य असलेले ९ इमारतींचे सुंदरनगर हे गृहसंकुल वसले आहे. त्याला पालिकेच्या जलवाहिनीतून डिसेंबर २०१४ पासून सातत्याने दूषित पाणीपुरवठा होत आहे. ही समस्या मार्गी लागावी, यासाठी रहिवाशांनी काही राजकीय मंडळींकडे तक्रारी केल्या होत्या. त्यावेळी पालिकेने दूषित पाणीपुरवठा कुठून होतो, त्याचा शोध घेतला नाही. मात्र त्यानंतरच्या कालावधीत रहिवाशांना दूषितऐवजी रहिवाशांना स्वच्छ पाणीपुरवठा होऊ लागला. तद्नंतर मागीलप्रमाणे पुन्हा दूषित पाणी येऊ लागल्याने रहिवाशांनी पालिकेकडे जुलै महिन्यात तक्रारी केल्या होत्या. त्यावर पालिकेने दूषित पाणीपुरवठ्याचा शोध घेण्याऐवजी २० आॅगस्ट रोजी रहिवाशांनाच नोटीसा बजावून त्यात पालिकेच्या जुन्या जलवाहिनीवरुन घेण्यात आलेल्या नळजोडण्या बदलून त्या नवीन जलवाहिनीवरुन घ्याव्यात. त्यासाठी प्रती कुटुंबाने ५०० रु. प्रमाणे तर उर्वरीत खर्च सोसायटीने करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ए - ५ व ए - ६ या इमारतीतील रहिवाशांनी जुनी जलवाहिनी काढून पालिकेच्या नवीन जलवाहिनीवरुन नवीन नळजोडणी घेतली. तरीदेखील त्यांना पुन्हा दूषित पाणीपुरवठाच सुरु झाल्याने त्याचा शोध रहिवाशांनी घेतला असता २००१ मध्ये टाकलेल्या पालिकेच्या जलवाहिनीवरुन जोडलेल्या ११ नळजोडण्यांना स्वच्छ तर २००८ मध्ये टाकलेल्या जलवाहिनीवरुन जोडलेल्या ११ नळजोडण्यांतून दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे लक्षात आले आहे. दरम्यान हे दूषित पाणी प्यायल्याने येथील ५२ जणांना कावीळ झाल्याचे तेथील रहिवाशांनी सांगितले. याप्रकरणी त्यांनी उपमहापौर प्रवीण पाटील यांच्याकडे धाव घेतली असता उपमहापौरांनी गृहसंकुलाला भेट देऊन माहिती घेतली. त्यावर त्यांनी बोलविलेल्या बैठकीत पालिकेच्या नवीन जलवाहिनीस कुठेतरी गळती झाल्यानेच रहिवाशांना दूषित पाणीपुरवठा होत असून दिलेल्या नळजोडण्या पुन्हा जुन्या जलवाहिनीवरुन देण्याचे निर्देश दिले. परंतु, त्यावर ठोस निर्णय न झाल्याने सोमवारी (३१ आॅगस्ट) वरिष्ठ अधिकाऱ्यांसाबेत बैठक घेऊन त्यावर मार्ग काढण्यात येणार असल्याचे उपमहापौरांनी सांगितले.(प्रतिनिधी)