शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Mira Road: मेट्रो मार्गिकेखालच्या मीरारोड येथील उड्डाणपुलाचे ह्याच महिन्यात होणार लोकार्पण, दोन्ही आमदारांनी केली पुलाची पाहणी 

By धीरज परब | Updated: July 16, 2024 19:10 IST

Mira Road News: मीरा भाईंदर मेट्रो मार्गिके खालून जाणाऱ्या मीरारोडच्या प्लेझन्ट पार्क ते सिल्वर पार्क उड्डाणपुलाचे ह्याच महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वा त्यांच्या मान्यतेने लोकार्पण केले जाणार आहे . त्यामुळे ह्या मार्गावरील वाहतूक कोंडीतुन नागरिकांना दिलासा मिळणार आहे .  

मीरारोड -   मीरा भाईंदर मेट्रो मार्गिके खालून जाणाऱ्या मीरारोडच्या प्लेझन्ट पार्क ते सिल्वर पार्क उड्डाणपुलाचे ह्याच महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वा त्यांच्या मान्यतेने लोकार्पण केले जाणार आहे . त्यामुळे ह्या मार्गावरील वाहतूक कोंडीतुन नागरिकांना दिलासा मिळणार आहे .  एमएमआरडीए क्षेत्रात मेट्रोच्या खालून उड्डाणपूल आणि त्या खालून रस्ता अर्थात डबलडेकर पूल पहिल्यांदाच बांधला गेल्याची माहिती यावेळी आमदार प्रताप सरनाईक सह आमदार गीता जैन यांनी दिली .  

मीरा भाईंदर शहराच्या मुख्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरून मेट्रोच्या कामा मुळे रस्त्याची दुरावस्था आणि वाहतूक कोंडी होत आहे . मेट्रो मार्गिके खालीच ह्या मार्गावरील प्रमुख वाहतूक कोंडी होणाऱ्या जंक्शन वर उड्डाणपूल बांधण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी सातत्याने चालवली होती . 

छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरील प्लेझेंट पार्क ते सिल्वर पार्क सिग्नल ह्या मेट्रो खालच्या नवीन उड्डाण पुलाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. त्याच्या कामाची पाहणी मंगळवारी आ . सरनाईक व आ . जैन यांनी  केली . यावेळी एमएमआरडीएच्या कार्यकारी अभियंता योजना पाटील, जे कुमार ईन्फ्राचे प्रोजेक्ट व्यवस्थापक सुब्रतोदास अधिकारी तसेच एमएमआरडीए व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. पुलाच्या डिव्हायडर , रिफ्लेक्टर , रंगकाम अशी काही कामे आठवडाभरात पूर्ण होणार आहेत . पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून नागरिकां साठी ह्याच महिन्यात तो खुला केला जाणार आहे . 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचे लोकार्पण व्हावे अशी विनंती करून त्यांचा वेळ मागितला आहे .  किंवा मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने स्थानिक खासदार , आमदार यांच्यासह नागरिकांच्या उपस्थितीत उड्डाणपुल खुला केला जाईल असे दोन्ही आमदार यांनी सांगितले . उडाणपुलाच्या कामाचा आढावा घेत यांनी अधिकाऱ्यांना कामे पूर्ण करण्याच्या सूचना केल्या .  

मेट्रो साठी आपण सातत्याने पाठपुरावा , विधिमंडळात मुद्दा उपस्थित करत मेट्रो मंजूर करून आणली . मात्र मुख्य रस्त्यावरील वाहतुकीची मोठी वर्दळ पाहता २०२० साली त्यावेळच्या एमएमआरडीएच्या अतिरिक्तआयुक्त सोनिया सेठी यांच्यासह प्रत्यक्ष प्रमुख नाक्यांच्या जंक्शनच्या ठिकाणी पाहणी करून उड्डाणपुलाची आवश्यकता आपण निदर्शनास आणून दिली होती . नंतर एमएमआरडीए कडून खाली मुख्य रस्ता आणि वर मेट्रो मार्गिकेच्या मध्ये डबलडेकर असे ३ उड्डाणपूल मंजूर केले .  त्यासाठी २१७ कोटींचा निधी मंजूर केला गेला व त्यानुसार उड्डाणपुलाची कामे होत असल्याचे आ. सरनाईक यांनी सांगितले . 

एमएमआरडीए क्षेत्रातील वरून मेट्रो व खालून उड्डाणपूल असा हा पहिला इंट्रीग्रेटेड पूल १ किलोमीटर लांबीचा आहे. पुलाची १७.५ मीटर रुंदी तर रॅम्पची रुंदी १९. ५ मीटर इतकी आहे. या उड्डाणपुलास लाल रंगाची थीम येथे ठरविण्यात आली आहे. या उड्डाणपुलासाठी जवळपास ७५ कोटींचा खर्च झाला आहे. ह्या उड्डाणपुलामुळे २ मोठ्या नाक्यांचा अडसर दूर होऊन वाहतूक कोंडी सुटणार आहे . 

टॅग्स :mira roadमीरा रोड