शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदरची परिवहन सेवा पंक्चर

By admin | Updated: December 2, 2015 00:21 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेची परिवहन सेवा चालवणाऱ्या ठेकेदार कॅस्ट्रल इन्फ्रास्ट्रक्चरकडे कर्ज व त्याच्या व्याजापोटी तब्बल १६ कोटी ९४ लाख रुपयांची थकबाकी असल्याने

मीरारोड : मीरा-भार्इंदर महापालिकेची परिवहन सेवा चालवणाऱ्या ठेकेदार कॅस्ट्रल इन्फ्रास्ट्रक्चरकडे कर्ज व त्याच्या व्याजापोटी तब्बल १६ कोटी ९४ लाख रुपयांची थकबाकी असल्याने त्यास परस्पर रक्कम देऊ नये असे पत्र स्टेट बँक आॅफ इंडियाच्या नरिमन पॉइंट येथील मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या शाखेने पालिकेला दिल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे शहरातील परिवहन सेवा धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे.नव्या बस खरेदीत स्वत:चा ५० टक्के वाटा भरण्याकरिता कंत्राटदाराने बस तारण ठेवून कर्ज काढल्याची प्राथमिक माहिती आहे. कर्जाची व थकबाकीची रक्कम मोठी असल्याने नेमक्या कर्जाची रक्कम व बसची संख्या किती, असा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र शासनाच्या जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गत २५० बस मिळण्याचा प्रस्ताव पालिकेने दिला असता ५० टक्के अनुदानातून सुरुवातीला ५० बसची खरेदी मंजूर झाली. परंतु बस खरेदीसाठी ९ कोटी ८८ लाख ७८ हजार रुपयांचा खर्च असल्याने त्यातील ५० टक्के रक्कम पालिकेला भरावी लागू नये म्हणून पीपीपी तत्त्वावर ठेकेदार नियुक्त करुन त्याच्याकडून ५० टक्के रक्कम भरुन घेण्याचा निर्णय झाला. त्यानुसार कॅस्ट्रल इन्फ्रास्ट्रक्चर या नवनियुक्त ठेकेदाराने बस खरेदी किमतीच्या ५० टक्के इतकी रक्कम म्हणजेच ४ कोटी ९४ लाख ३९ हजार रुपये ९ एप्रिल २०११ रोजी पालिकेत जमा केले. सदर रक्कम जमा करण्यास ५ महिन्यांचा विलंब झाला. शिवाय आधीच्या ठेकेदाराच्या ५२ बसदेखील कॅस्ट्रलकडे हस्तांतरीत करण्यात आल्या. वास्तविक ठेकेदाराने स्वत: बस खरेदीची ५० टक्के रक्कम उभारणे आवश्यक असताना ती रक्कम देखील त्याने कर्ज उभारुन भरली. कॅस्ट्रल सोबत १० वर्षांचा करार असला तरी परिवहन सेवा डबघाईला आल्याने आता पालिकेने नवीन बस स्वत: चालवण्यास घेतल्या. शिवाय कॅस्ट्रलने देखील गेल्या महिन्यापासूनच आपला पसारा आटोपला. सध्या ठेकेदार व महापालिकेत न्यायालयीन वाद रंगला आहे. यात ठेकेदाराने पालिकेडून ४० कोटी रुपयांची रक्कम येणे असल्याचा दावा केला आहे. तर पालिकेने ठेकेदाराकडूनच ४५ कोटी रुपये वसूल करायचे असल्याचा पावित्रा घेतलाय. पालिकेकडून ४२ कोटी रुपये येणे असल्याने ते मिळताच कर्जाची थकबाकी भरणार असल्याचे कॅस्ट्रलचे राजा गेमनानी यांनी बँकेस कळवले आहे. (प्रतिनिधी)