शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

मीरा-भाईंदर महापालिका निवडणूक, भाजपाच्या उमेदवाराचा अर्ज रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 14:44 IST

शांती नगर प्रभाग २० ब च्या भाजपा उमेदवार डॉ. नयना मनोज वसाणी यांनी शपथपत्रात गुन्ह्यांची माहिती देताना ७ वर्ष कारावास व द्रव्य दंडाच्या शिक्षेची तरतुद असलेले कलम लपवले

मीरारोड, दि.  4 - मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत शांती नगर प्रभाग २० ब च्या भाजपा उमेदवार डॉ. नयना मनोज वसाणी यांनी शपथपत्रात गुन्ह्यांची माहिती देताना ७ वर्ष कारावास व द्रव्य दंडाच्या शिक्षेची तरतुद असलेले कलम लपवले तसेच शैक्षणिक पात्रता लपवली म्हणुन निवडणुक निर्णय अधिकारी यांनी वसाणी यांचा उमेदवारी अर्ज रद्द केला आहे. या मुळे भाजपाला धक्का बसलाय.मीरारोडच्या शांती नगर भागातील प्रभाग क्र. २० हा भाजपाला चांगलाच डोकेदुखीचा ठरलाय. भाजपाचे विद्यमान नगरसेवक दिनेश जैन यांना डावलुन आ. नरेंद्र मेहता यांनी शिवसेनेच्या प्रशांत दळवी यांना भाजपात घेत उमेदवारी अर्ज भरायला सांगीतला. त्यावरुन जैन यांनी थेट हक्काची उमेदवारी दिली नाही तर शिवसेनेत जाणार असा इशारा देताच दळवी यांना प्रभाग १७ मध्ये पाठवण्यात आले. परंतु जैन यांच्या सह भाजपाने भावेश गांधी यांना पण बी फॉर्म दिल्याने जैन यांची डोकेदुखी वाढवली. सुदैवाने जैन यांनी आधी अर्ज भरला असल्याने त्यांना भाजपाचा अधिकृत उमेदवार म्हणुन निवडणुक निर्णय अधिकारी यांनी जाहिर केले.याच प्रभागातुन महिलांच्या इत्तर मागासवर्ग प्रवर्गातुन भाजपाने हेतल परमार यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगीतले. भाजपाचे पॅनल मधले अन्य उमेदवार दिनेश जैन, नगरसेविका डॉ. नयना वसाणी व नगरसेवक अश्विन कासोदरीया सह परमार अर्ज भरण्यास गेल्या असता त्यांना फोन करुन अर्जभरु नका म्हणुन भाजपा कडुन सांगण्यात आले. आ. मेहतांनी सुधीर कांबळी यांच्या पत्नीस अर्ज भरण्यास सांगीतले. पण अर्ज भरण्याची तयारी केली असता आयत्या वरती कांबळींचा पत्ता कापत परमार यांना उमेदवारी बहाल केली.दरम्यान गुरुवारी दुपारी दिडच्या सुमारास छाननीच्या वेळी शिवसेनेच्या दिप्ती भट व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सीमा जैन यांनी वसाणी यांनी अर्जा सोबत जोडलेल्या शपथपत्रात व नंतर दिलेल्या अतिरीक्त शपथपत्रात गुन्ह्याची माहिती देताना भादविचे कलम ४५२ चा उल्लेखच केला नसल्याने त्यांचा अर्ज बाद करण्याची मागणी निवडणुक निर्णय अधिकारी अर्चना कदम यांच्या कडे केली.कदम यांनी छाननी नंतर यावर सायं. ५ च्या सुामारस सुनावणी घेतली. वसाणी यांच्या वतीने आपण गुन्ह्याची माहिती लपवली नसुन सदरचे कलम जागा कमी असल्याने चुकुन राहिले व ती टायपिंग मिस्टेक असल्याचे सांगीतले.तर सीमा जैन यांच्या वतीने अ‍ॅड. विक्रम तारे-पाटील यांनी युक्तीवाद करताना सर्वोच्च न्यायालयाच्या ५ फेब्रुवारी २०१५ च्या आदेशाचा संदर्भ दिला. उमेदवार निवडणुक लढत असताना लोकां कडुन मतं मागत असतो. त्यावेळेस विशेषत: गुन्ह्यां बाबतची सर्व माहिती देणे हा शपथपत्राचा मुख्य उद्देश आहे असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटल्याचे तारे पाटील यांनी सांगीतले. वसाणी यांनी जाणुन बुजुन दोन वेळा शपथपत्रात या गंभीर कलमाची माहिती लपवली. दिप्ती भट यांच्या वतीने अ‍ॅड. धीरज श्रीवास्तव यांनी देखील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा मुद्दा लावुन धरला.या मुळे राम नगर येथील कार्यालयात तसेच बाहेर भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी, कार्यकर्ते व उमेदवार मोठ्या संख्येने जमु लागले. भाजपाचे आमदार, नेते मंडळींनी देखील हजेरी लावली. गर्दी वाढत असल्याने पोलिस निरीक्षक धनाजी कलंत्रे व सहकारयांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना बाहेर काढले.रात्री ८ वाजता निकाल देणार असे निवडणुक निर्णय अधिकारी अर्चना कदम यांनी म्हटले होते. पण मध्यरात्री त्यांनी आपला लेखी निर्णय दिला. कदम यांनी आपल्या निष्कर्षात उमेदवार वसाणी यांना संबंधित कलमा बाबत सुंपुर्ण माहिती होती. तरी देखील त्यांनी ती माहिती शपथपत्रात दर्शवली नाही. शिवाय त्यांच्या शैक्षणिक अर्हतेच्या रकान्यात त्यांनी स्वत:च्या शैक्षणिक पात्रतेचा उल्लेख न करता केवळ प्रोफेशनल असा उल्लेख केल्याचे देखील कदम यांनी समोर आणले. वसाणी यांनी कलम ४५२ चा उल्लेख जाणीवपूर्वक दोन्ही शपथपत्रात केला नाही व शिक्षणाची माहिती दिली असा निष्कर्ष काढत कदम यांनी वसाणी यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवला. या निर्णया मुळे उपस्थित भाजपाच्या गोटात खळबळ उडाली. वसाणी यांचा उमेदवारी अर्जच बाद झाल्याने भाजपाचे पॅनल अडचणीत आले आहे.दरम्यान वसाणी ह्या उमेदवारी अर्ज रद्द केल्याच्या निर्णया विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे.