शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा

By धीरज परब | Updated: December 19, 2025 20:02 IST

शनिवारी उपमुख्यमंत्री यांच्या निर्धार मेळाव्यात शिवसेनेची ताकद दाखवणार

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपासोबत युतीमध्ये शिवसेनेला ५० टक्के जागा हव्यात, अशी भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडली. २०१७च्या आणि आताच्या परिस्थितीमध्ये मोठा बदल झाला आहे. शिवसेनेची ताकद वाढलेली आहे. २० डिसेंबरला होणाऱ्या निर्धार मेळाव्यात आमची वाढलेली ताकद दाखवून देऊ, असा विश्वासही मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे मीरा भाईंदरचे भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी ९५ पैकी ६५ जागा स्वतः आणि १७ जागा शिवसेनेला देण्यासह उर्वरित १३ जागा वाटून घेण्याचा फॉर्म्युला दिला आहे. २१ डिसेंबरला भाजपाचा संकल्प मेळावा होत आहे.

सर्व ९५ जागांवर शिवसेनेचे उमेदवार तयार

मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका निवडणुकीत महायुतीने लढायचे सांगितल्याने सर्व महापालिका निवडणुकीत युती होत आहे. आमची युतीची इच्छा आहे. पण भाजपाच्या स्थानिक नेत्यांची युती करायची इच्छा नाही. धोका नको म्हणून सर्व ९५ जागांवर शिवसेनेचे उमेदवार तयार असून मुलाखती सुरु आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना २०१७ आणि आताच्या स्थितीत फरक असल्याचे आपण निदर्शनास आणून दिले आहे. त्यावेळी देखील शिवसेनेचे ८ ते १० उमेदवार हे अवघ्या काही मतांनी हरले होते. गेली ३ वर्ष पालिकेत कोणाचीही सत्ता नाही. त्या ३ वर्षात आपण अनेक विकास कामे केली आहेत," असे सरनाईक म्हणाले.

"मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी १८०० कोटींचा निधी दिला. शहरात लोकांना त्याचा परिणाम दिसत आहे. मेट्रो प्रकल्प झाला, आपण मेट्रो खाली तीन उड्डाणपूल करून घेतले. सूर्या पाणी पुरवठा योजना मार्गी लावली. त्यातून ६ महिन्यात पाणी मिळेल. बाळासाहेब ठाकरे कलादालन, लता मंगेशकर नाट्यगृह, गिल्बर्ट मेंडोन्सा ट्राफिक पार्क, मेंडोन्सा यांच्या नावाने ४०० खाटांचे रुग्णालय बांधले जात आहे. बीएसयुपी योजनेत घरे वाटप, वारकरी भवन, मराठा भवन, सरदार वल्लभभाई पटेल भवन, महाराणा प्रताप भवन, विठ्ठलाची ५१ फूट उंच मूर्ती, संगीत कारंजी विविध समाज भवन आदी अनेक विकास कामे करण्यात आली आहेत," अशी यादीच त्यांनी वाचून दाखवली.

"काहींना वाटते की शिवसेनेची मीरा भाईंदरमध्ये ताकद नाही. मात्र त्यांना दाखवून देऊ की शिवसेनेची ताकद किती आहे. शनिवारी मीरारोडच्या शिवार उद्यानात ४ वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना निर्धार मेळावा आहे. तेव्हा सगळ्यांनाच आपली ताकद दिसेल," असे सरनाईक म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Sarnaik Warns: 50% Seats in Mira Bhayandar Needed or Else...

Web Summary : Minister Sarnaik demands 50% of Mira Bhayandar seats for Shiv Sena in alliance with BJP. He emphasizes Shiv Sena's increased strength and warns of showcasing power if demands aren't met. BJP proposes a seat-sharing formula, but Shiv Sena prepares to contest all seats.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Mira Bhayander Municipal Corporation Electionमीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणूक २०२६pratap sarnaikप्रताप सरनाईकShiv SenaशिवसेनाBJPभाजपा