शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदरमध्ये जैन समाजाने नागरिकांसाठी सुरू केले १२५ खाटांचे मोफत कोविड रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 00:01 IST

भिनमाल जैन संघाचे मुकेश वर्धन आणि सहकारी यांनी सांगितले की, मुंबईमध्ये २ ठिकाणी कोविड रुग्णालय सुरु करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा राेड :  भाईंदरच्या इंद्रलोक येथील तपोवन विद्यालय इमारतीत भिनमाल जैन संघच्या पुढाकाराने तसेच आमदार गीता जैन यांच्या सहकार्याने १२५ खाटांचे कोविड रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. त्याचे उदघाटन नगरविकास तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. या कोरोना रुग्णालयात नागरिकांवर मोफत उपचार व सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत.

भिनमाल जैन संघाचे मुकेश वर्धन आणि सहकारी यांनी सांगितले की, मुंबईमध्ये २ ठिकाणी कोविड रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. मीरा भाईंदरमध्येसुद्धा कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी तपोवन विद्यालय इमारतीत १२५ खाटांचे रुग्णालय सुरु करण्यात आले असून त्याचे उदघाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १ मे रोजी करण्यात आले. गरज पडली तर भाईंदरसाठी आणखी एक उपचार केंद्र सुरु करू.१२५ खाटांच्या रुग्णालयात ७५ खाटा ऑक्सिजन सुविधेच्या असाव्यात असे प्रयत्न सुरु आहेत. हे रुग्णालय सर्व समाजातील नागरिकांना खुले आहे. सर्वांना उपचार, जेवण आदी सर्व सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी सरकार प्रयत्न करतेय, त्यांच्या मर्यादा आहेत म्हणून जैन समाज नेहमीप्रमाणेच मदतीसाठी पुढे आला आहे. कोरोना संकट काळात जैन समाज सर्वांसोबत आहे . खाटा नाहीत किंवा ऑक्सिजन नाही म्हणून कोणी रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये यासाठी उपचार केंद्रे सुरु करत आहोत असे मुकेश वर्धन म्हणाले.

भन्साळी उद्योगाचे बाबूलाल भन्साळी, भिनमाल जैन संघ, वर्धमान संस्कारधाम, सचोरी ग्रुप मंडळ, तपोवन विद्यालय आदींनी या रुग्णालयासाठी योगदान दिले आहे. या प्रसंगी खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक व गीता जैन, आयुक्त दिलीप ढोले आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी भिनमाल जैन संघासह सहयोगी जैन समाजाच्या संस्थांचे कौतुक केले. कोरोनाच्या महामारीत समाजाने नागरिकांना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी घेतलेला पुढाकार कोरोना विरोधातील लढ्याला आणखी बळ देणारा असल्याचे खा. विचारे म्हणाले.

मेहतांच्या राजकीय उद्घाटन नाट्यावर टीकाnरुग्णालय सुरु करण्यासाठी भिनमाल जैन संघ आदींनी तयारी दर्शवल्यावर खा. विचारे व आ. गीता जैन यांनी पालिका आयुक्तांना आवश्यक सहकार्य करण्याची सूचना केली. nआ. गीता जैन यांनी पुढाकार घेतला. लोकार्पणाचा कार्यक्रम आदल्या दिवशी जाहीर झाला होता. असे असताना माजी आमदार नरेंद्र मेहतांनी पालकमंत्री यायच्या आधी जाऊन फित कापली आणि उदघाटन केल्याचे सांगत फोटो सोशल मीडियावर शेअर केले. nपरंतु स्वतः मुकेश वर्धन यांनी उदघाटन पालकमंत्र्यांनी केल्याचे जाहीर करत राजकारणाला कात्री लावली. मेहतांचे हे राजकीय उदघाटन नाट्य निंदनीय असल्याची टीका विविध स्तरातून होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या